web-banner-lshep2024

Breaking News

अदानी समूह देणार चीनला टक्कर; विझिंगम बंदरासाठी करणार 10,000 कोटींची गुंतवणूक!

देशातील आघाडीचा उद्योग समूह असलेल्या अदानी समूहाकडून चीनला टक्कर देण्याची तयारी सुरु आहे. अदानी समूह दक्षिण भारतातील ट्रान्सशिपमेंट कंटेनर पोर्ट मजबूत करण्यासाठी तब्बल 10,000 कोटी रुपयांची अर्थात 1.2 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे. ज्यामुळे आता भारताचे चीनवर अवलंबून राहण्याचे प्रमाण कमी होणार असून, मोठी कंटेनर भारतातच आणण्याची अदानी समूहाची योजना आहे.

अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड (एपीएसईझेड) ही अदानी समूहाची कंपनी आहे. ही कंपनी दक्षिण भारतातील ट्रान्सशिपमेंट कंटेनर पोर्ट मजबूत करण्यासाठी 10,000 कोटी रुपयांची अर्थात 1.2 अब्ज डॉलर इतकी गुंतवणूक करणार आहे. जगातील सर्वात मोठी जहाजे याठिकाणी त्यातून व्यापाराच्या संधी निर्माण व्हाव्यात, हा या गुंतवणुकीचा उद्देश आहे. तसेच चीनचे सार्वभौमत्व कमी करुन मोठी कंटेनर जहाजे भारतात आणण्याची अदानी समूहाची योजना आहे. असे सांगितले जात आहे. त्यामुळे आता चीनला शह देण्यासाठी अदानी समूहाची ही योजना महत्वाची मानली जात आहे.

अदानी समूहाकडून विझिंगम बंदराचे नुकतेच गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये उदघाटन करण्यात आले आहे. हे बंदर अनेक दृष्टीने चीनचे सागरी व्यापारातील वर्चस्व कमी करण्यासाठी महत्वाचे आहे. अदानी समूहाचा उद्देश हा भारताला जगातील सर्वात मोठ्या कंटेनर जहाजांसह नकाशावर आणण्याचा आहे. दक्षिण भारतीय बंदरांमध्ये खोली नसल्यामुळे अनेक जागतिक कंटेनर भारतात येणे टाळत होते. मात्र, आता या गुंतवणुकीमुळे बंदराच्या विकासासाठी मोठी मदत होणार आहे.


ट्रान्सशिपमेंट कंटेनर पोर्ट म्हणजे काय तर मालवाहू जहाजातून दुसऱ्या मोठ्या मदर जहाजाला दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणे. विझिंजम बंदरामध्ये जहाजांसाठी बंकरिंग सुविधा उपलब्ध आहे. तसेच मोठ्या लक्झरी लाइन्ससाठी क्रूझ टर्मिनल बांधण्याव्यतिरिक्त अतिरिक्त क्रेन खरेदी करण्याची योजना आहे. अदानी समूहाचे हे बंदर या वर्षी सप्टेंबरमध्ये ओणमच्या आसपास व्यावसायिकदृष्ट्या कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. तर या गुंतवणुकीनंतर केरळमधील विझिंजम बंदरातील गुंतवणूक हा प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचा भाग आहे. जो 2028 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

No comments