राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कल्याण डोंबिवली जिल्ह्यातर्फे हृद्य सत्कार सोहळा...
कल्याण : कल्याण लोकसभा मतदार संघामध्ये मतदारांनी विश्वास ठेवून सलग तिसऱ्यांदा निवडून दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कल्याण डोंबिवली जिल्ह्यातर्फे आज लोकप्रिय खासदार कल्याण लोकसभा डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांचा सन्मान कल्याण पश्चिमेतील आचार्य अत्रे रंगमंदिरात करण्यात आला. या हृद्य सोहळ्याला महायुतीचे शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर कल्याण लोकसभेत मिळालेल्या विजयाचे श्रेय हे खासदार साहेबांनी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आर पी आय या महायुतीतील घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांना जात आहे.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या पुढाकाराने कल्याण लोकसभेत झालेली विकासकामे यांचाही आपल्या विजयात मोठा वाटा असल्याची भावना त्यांनी यावेळी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केली. तसेच इतक्या भव्य स्तरावर हा पुरस्कार सोहळा आयोजित केल्याबद्दल कल्याण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वांचे आभार मानले.
यावेळी कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव,कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष जगन्नाथ (आप्पा) शिंदे, प्रदेश सरचिटणीस प्रविण खरात, प्रदेश सरचिटणीस, सुभाष गायकवाड,भाजप जिल्हाध्यक्ष नरेंद्र (नाना) सुर्यवंशी, रमेश हनुमंते, भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार, शिवसेनेचे अरविंद मोरे, किसन ताळमाळे, समीर वानखेडे, अर्जुन नायर,उदय जाधव,मायाताई कटारिया, रश्मी कोलते,यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.



No comments