वारसाचे डाव-खरे कोण ठरवणार आमदार पदवीधरांच्या व्यासपीठ शाळेत जिल्हा परिषद विद्यार्थ्यांची गर्दी
नामदेव शेलार / मुरबाड :ठाणे कोकण पदवीधर मतदारसंघात तीन
तिघाडी विरुद्ध महाविकास आघाडी उमेदवारात चुरशीची लढत सुरू आहे ठाण्यातील
मित्रपरिवार आणि काँग्रेस राष्ट्रवादीचा दिग्गज नेते कै. वसंत डावखरे यांचे
पुत्र निरंजन डावखरे यांनी गेली दहा वर्ष पदवीधर मतदारसंघात राजकीय
वडिलांचा वारसा जोपासला आहे पुन्हा त्याच मार्गाने हॅट्रिक करण्याचा मनसुबा
पूर्ण करण्यासाठी निरंजन डावखरे यांनी भिवंडी लोकसभा मुरबाड विधानसभा
मतदारसंघात किंगमेकर आणि सिंघम अशा दोन्ही चालकांचा डाव-खरे आशीर्वाद
पुन्हा पाच वर्षांनी एकदा येऊन घेण्याचा प्रयत्न कार्यकर्ता बैठकीत केला
आहे.
गेल्या दहा वर्षात राजकीय चिखलात गुंतलेला
निरंजन कधीच पदवीधरांसाठी पेटला नाही हजारो पदवीधर बेरोजगारांना नोकऱ्या
नाहीत व्यवसाय नाही शासनाच्या योजनेचा लाभ नाही शाळा कॉलेजमधील मुला
मुलींच्या ऍडमिशन वाढती फीस शिष्यवृत्ती बँक कर्ज नवीन उच्चशिक्षित कॉलेज
वस्तीगृह अशा अनेक पदवीधरांच्या समस्या कडे दुर्लक्ष करून राजकीय
पक्षांच्या झेंड्याखाली वडिलांचा वारसा लादण्याचा प्रयत्न केला आहे त्यावर
मुरबाड सह ग्रामीण भागातील युवक युवतींने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
राजकीय सत्ताधारी विरोधकांचा आशीर्वाद डावखरे पदरात पाडून घेऊन पुन्हा पाच
वर्ष ठाण्यात जाऊन बसणार आहेत त्यांचे प्रतिस्पर्धी मातंबर नसल्याने
अमावस्या पौर्णिमेला येणाऱ्या अपरिचित उमेदवारामुळे वारसदाराला लोकसभेच्या
दुरावाचा फायदा कसा मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. मदत करणाऱ्या नेते कार्यकर्ते यांच्या शाळा कॉलेज यांना रस्ते इमारती
साहित्य साठी निधी दिल्याचा कांगावा अहवाल मुरबाड येथील पदवीधर कार्यकर्ता
बैठकीत दिला मात्र तेथे पदवीधरानपलीकडे जिल्हा परिषदेचे जुने जाणते पदवीधर
नसलेले विद्यार्थी जेष्ठ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोकण विभाग पदवीधर मतदार संघात सुद्धा राजकारण्यांनी आपली मोहड रोवली आहे
युवकांना दिशाहीन करून राजकारण कोणत्या स्तराला जात आहे याबद्दल पदवीधरात
तीव्र नाराजी आहे.
पदवीधरांना स्वतंत्र विचारसरणीचा आमदार अद्यापही मिळाला
नाही गेल्या पाच वर्षात राज्यात यूपीएससी एमपीएससी परीक्षांचा राडा
रस्त्यावरील आंदोलने युवक विसरलेले नाहीत पदवीधरांची निवडणूक राजकारणाशी
संबंधित नसावी शिक्षणाची निवडणूक राजकीय स्वार्थापोटी असता कामा नये या
विचाराचे मतदार भय भीतीने मतदान करतात पदवीधर नसलेला कार्यकर्ता पदवीधर आणि
शिक्षकांचा आमदार ठरवणार असेल तर त्याचा मौल काय असणार बापाचा वारसा होता
म्हणून निरंजन डावखरे हॅट्रिकच्या भूमिकेत वावरत आहेत त्यांच्या व्यतिरिक्त
ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा उमेदवार राजकीय पक्षीय मंडळींना सापडला
नाही हे येथील ग्रामीण भागातील पदवीधरांचे दुर्दैव आहे.
निरंजन डावखरे निवडून येणार अशी ओरड आजी-माजी आमदार खासदार पदाधिकारी करत
आहेत परंतु दहा वर्षात निरंजन डावखरेने ग्रामीण पदवीधर युवकांसाठी काय
योगदान दिले त्यांना ब्रेक दिला पाहिजे पदवीधर उमेदवार कोणत्या पक्षाचा
नसावा फक्त समस्याग्रस्त बेरोजगार उच्चशिक्षितांच्या समस्या सोडवणारा
निपक्षपाती असावा अशी मतदार युवकांची पसंती आहे.



No comments