web-banner-lshep2024

Breaking News

कराटे मास्तर वसंत जमदरे यांना मातृशोक

नामदेव शेलार / मुरबाड : मुरबाड जवळील देवपे गावातील मंजुलाबाई सिताराम जमदरे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या निधनाने संपूर्ण मुरबाड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे वारकरी सांप्रदायक असलेल्या मंजुलाबाई सिताराम जमदरे काही दिवस आजारी होत्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.

    हजारो मुलांना कराटे फायटर बॉक्सिंग मध्ये घडवणारे कराटे मास्तर वसंत जमदरे यांच्या त्या आई होत्या कै.मंजुलाबाई सिताराम जमदरे यांचा दशक्रिया विधी मंगळवार 11 जून 2024 रोजी सकाळी श्री क्षेत्र घोडदेश्वर मुरबाड येथे होणार असून उत्तर कार्य विधी बुधवार १२ जून 2024 रोजी देवपे गावी राहत्या घरी होणार आहे.

      शेती कामांना प्राधान्य देऊन जुन्या आठवणीने मुलांवर उच्च शिक्षणाचे संस्कार घडविले ग्रामीण संस्कार रूढी परंपरा कौटुंबिक एकता टिकवण्याचा संदेश देऊन नव्या पिढीला इतिहासकालीन माहिती सांगणाऱ्या वारकरी सांप्रदायाची भक्तिमय सेवा करणाऱ्या कै.मंजुलाबाई सिताराम जमदरे यांचा निधन मनाला चटके लावून गेल्याच्या प्रतिक्रिया मान्यवरांनी व्यक्त केले आहेत. कै.मंजुलाबाई जमदरे यांच्या पश्चात पती सिताराम महादू जमदरे, मुलगा वसंत सिताराम जमदरे यांच्यासह मोठा परिवार आहे.

No comments