मुरबाड ५१.१८ टक्के मतदान : तर भिवंडी लोकसभेत ४८.८९ टक्के मतदान
मुरबाड : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात 23 भिवंडी लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पडले त्यात सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत अंदाजे 48.89 टक्के मतदान झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला ठाणे जिल्ह्यातील 23 भिवंडी लोकसभा मतदारसंघात आज दि. 20 मे 2024 रोजी सकाळी 7.00 वाजल्यापासून सुरुवात झाली. 23 भिवंडी मतदारसंघातील एकूण 6 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत अंदाजे सरासरी 48.89 टक्के मतदान झाले आहे.ठाणे जिल्ह्यातील 23 भिवंडी मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे.134- भिवंडी ग्रामीण – 58.00 टक्के.,135 शहापूर – 50.99 टक्के,136 भिवंडी पश्चिम – 47.80 टक्के,137 भिवंडी पूर्व – 43.37 टक्के,138 कल्याण पश्चिम –43.00 टक्के,139 मुरबाड – 51.18 टक्के ही आकडेवारी अंदाजे असून अंतिम आकडेवारी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मिळणार असल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली आहे



No comments