1977 पासून 2024 पर्यंत भिवंडी लोकसभेतील उमेदवारांचा निवडणूक कालखंड सहा महिने;आटापिटा केलेला प्रचार पेटी बंद उमेदवारांची धाकधूक वाढली....!
नामदेव शेलार / मुरबाड : 1977 पासून 2019पर्यंत लोकसभा निवडणुकीत लढलेले उमेदवार त्यांना मिळालेली मते यांचा कानोसा घेऊन वीस मेला मतदान होऊन विजय कोण होणार याची चर्चा 4 जून पर्यंत रंगणार आहे. गेले सहा महिने इच्छुकांपासून राजकीय पक्ष अपक्ष उमेदवारांचा प्रचाराचा आटापिटा पेटी बंद होऊन उमेदवारा धाकधूक वाढणार आहे मतदान केंद्रावर मतदान पेट्या पोहोचल्या मात्र मतदानापर्यंत वोटर स्लिप मतदारांना पोहोचली नसल्याने मतदान क्रमांक मतदान केंद्र याबद्दल मतदारांना संभ्रम निर्माण झाल्याची स्थिती समोर आली आहे. ठाणे जिल्ह्यात भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपा विरोधी इंडिया आघाडी आणि अपक्ष निलेश सांबरे यांची कडवी लढत मतदारांच्या मतदानातून शांत होणार आहे एकीकडे नाराजी दुसरीकडे वरिष्ठ नेत्यांचा आदेश उमेदवारांनी ज्यांच्यावर अति विश्वास टाकून वाटप यंत्रणा वापरली त्यांच्यावर मतदारांचा असलेला रोष याचा परिणाम उमेदवारावर होतो असाच प्रकार भिवंडी लोकसभेत चर्चेतून समोर येत आहे.
भिवंडी लोकसभेत सत्ताधारी पक्षाचे उमेदवार कपिल पाटील यांच्या विरोधात इंडिया आघाडी आक्रमक झाली असताना दोन्हीही उमेदवारांच्या पेक्षा अपक्ष निलेश सांबरे बहुजन समाजाच्या जोरावर कडवे अहवाल उभे केले आहे त्यांना कुणबी समाजाची भरीव साथ मिळाल्यास भिवंडी लोकसभेत नवा विक्रम उभा राहणार आहे निलेश सांबरे यांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला भिवंडीच्या एमआयएम खानदेश सेना सकल मराठा समाज कुणबी समाज संघटना यासह सर्व समाजाचे मतदार त्यांच्या प्रचारात उतरले त्यांची सर्वांची मते मतपेटीत बंद झाल्यास 1977 पासून चा अबाधित रेकॉर्ड मोडला जाणार आहे 1977 ला भा.लो.द.चे पहिले खासदार रामभाऊ म्हाळगी झाले त्यांनी काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव केला तेव्हा अपक्ष उमेदवार सहा होते 1980 ला जनता पक्षातून रामभाऊ म्हाळगी खासदार झाले त्यांनी काँग्रेसच्या पीएम हेगडे यांचा पराभव केला त्या निवडणुकीत सहा अपक्ष उमेदवार होते मात्र मतदानाची टक्केवारी कमी होती.
1984 ला काँग्रेसचे पहिले मुरबाडचे सुपुत्र शांताराम गोपाळ घोलप 3 लाख 28 हजार 709 मतांनी विजयी झाले त्या निवडणुकीत सर्वच अकरा अपक्ष उमेदवार रिंगणात होते राजकीय पक्षांचा एकही उमेदवार नव्हता 1989 मध्ये रामभाऊ कापसे भाजपामधून विजयी झाले त्यांना 4 लाख 67 हजार 898 मते होती तर शांताराम भाऊ घोलप यांचा पराभव झाला त्यांना 3 लाख 79 हजार 609 मते मिळाली होती त्यावेळी सात अपक्ष उमेदवारांनी निवडणूक लढविली. 1991 ला भाजपाचे रामभाऊ कापसे तीन लाख 2928 मतांनी विजयी झाले त्यांच्या विरोधात काँग्रेसचे हरिबशसिंह राम लढले त्यांना 2 लाख 74 हजार 611 मते मिळाली तेव्हा 16 अपक्ष उमेदवार रिंगणात उभे होते. 1996 मध्ये शिवसेनेचे प्रकाश परांजपे विजयी झाले त्यांना चार लाख 66,773 मते तर तब्बल 28 अपक्ष उमेदवारांनी निवडणूक लढवली सपामधून राजाराम साळवी यांना 1 लाख 15,845 तर काँग्रेसचे हरिबशसिंह राम यांना 2 लाख 74,136 मते मिळाली होती.
1998 ला शिवसेनेचे प्रकाश परांजपे यांना 5 लाख 53,210 मते मिळवून त्यांचा विजय झाला सपाच्या चंद्रिका केनिया यांना 3 लाख 3,631 मते मिळाली त्या निवडणुकीत 10 अपक्ष उमेदवार लढले 1999 ला शिवसेनेचे प्रकाश परांजपे यांना 3 लाख 91,446 मते मिळवून त्यांचा विजय झाला तेव्हा त्यांच्या विरोधात प्रभाकर हेगडे राष्ट्रवादी काँग्रेस यांना 1 लाख 77,256 तर इंदिरा नॅशनल काँग्रेसचे नकुल पाटील यांना 2 लाख 91,763 मते मिळाली तेव्हा एकच अपक्ष उमेदवार होता. 2004 साली शिवसेनेचे प्रकाश परांजपे यांना 6 लाख 31,404 मते मिळाली त्यांचा निसटता विजय झाला राष्ट्रवादीचे वसंत डावखरे यांना 6 लाख 9,156 मते पडली होती या निवडणुकीत 4 अपक्ष लढले होते. 2008 मध्ये शिवसेनेचे आनंद प्रकाश परांजपे यांना 4 लाख 62,799 मते मिळवून त्यांचा विजय झाला त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी पक्षाचे संजीव गणेश नाईक यांना 3 लाख 71,894 मते मिळाली त्यांचा पराभव झाला त्यावेळी 11 अपक्षांनी निवडणूक लढवली या सर्व निवडणुका ठाणे लोकसभा मतदार संघ म्हणून लढल्या गेल्या परंतु 2009 पासून भिवंडी लोकसभा मतदारसंघाची रचना झाली तेव्हापासून येथील राजकारण ग्रामीण भागाची नाळ जोडलेले झाला आहे समाज सर्वच पूर्वीपासून आहेत मात्र स्थानिक दोन बलाढ्य समाजाचे उमेदवार देऊन राजकीय पक्षांनी सामाजिक एकीकरणाची ओटी सुन्न केली आहे.
2009 मध्ये भारतीय काँग्रेसचे सुरेश टावरे यांना उमेदवारी दिली त्यांना 1 लाख 82789 मते मिळवून त्यांचा विजय झाला त्यांच्या विरोधात आगरी समाजाचे भारतीय जनता पार्टीचे जगन्नाथ पाटील यांना लढविले गेले त्यांना 1 लाख 41,425 मते मिळाली त्यांचा पराभव झाला दोघांच्या मतांची बेरीज 3 लाख 25,000 (हजाराच्या) वर गेली त्याच समाजातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डिके म्हात्रे यांना 1 लाख 7090 मते पडली त्यांची एकूण मतांची संख्या 4 लाखाच्या वर मताचा आकडा गेला तेव्हापासून राजकीय समीकरण बदलत गेले तसं पाहिलं तर विजय उमेदवारांना भिवंडी शहर आणि मुरबाड विधानसभा मतदारसंघात लीड हवा असतय 2009 च्या निवडणुकीत 5 उमेदवार रिंगणात होते. 2014 मध्ये भिवंडी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी पक्षामधून भाजपमध्ये आलेले कपिल पाटील मोदी लाटेत 4 लाख 11,070 मतांनी निवडून आले काँग्रेसचे विश्वनाथ पाटील यांना 3 लाख 1620 मते पडली त्यांचा पराभव झाला त्यावेळी मनसेचे बाल्यामामा म्हात्रे यांना 93,674 मते पडली होती.
या निवडणुकीत तीन अपक्ष उमेदवार होते त्यांना 12,000 मते पडली होती या निवडणुकीत 9 लाखाच्या आत मतदान झाले होते. 2019 च्या निवडणुकीत भाजपाचे कपिल मोरेश्वर पाटील यांना 5 लाख 23,583 मते मिळाली तर भारतीय काँग्रेस पार्टीचे सुरेश काशिनाथ टावरे यांना 3 लाख 57,254 मते मिळाली होती वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर अरुण सावंत यांना 51,455 मते फळेगावचे नितेश जाधव यांना 20,697 मते मिळाली होती. त्यावेळी सात अपक्ष उमेदवार रिंगणात होते एकूण 10 लाखाच्या आत मतदान झाला होता एकाच समाजाचे दोन्ही उमेदवार होते त्यामुळे कोणीही आला तरी तो आपलाच अशा भूमिकेला येत्या 2024 च्या निवडणुकीला वेगळा रंग आला आहे.2 आगरी समाजाचे उमेदवार 1 कुणबी समाजाचा उमेदवार अपक्षांची संख्या मोठी आहे. यावेळी सर्वात जास्त 27 उमेदवार रिंगणात आहेत मतदानाची टक्केवारी दिवसेंदिवस घटत चालली आहे मोदीची लाट हवी तशी नाही कुणबी समाजात झालेली जागृती पुन्हा 1984 चा शांताराम भाऊ घोलप वैभव परत आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याने 21 लाखाच्या एकूण मतदानात दहा लाखाच्या आसपास मतदान होईल त्यापैकी अपक्ष पन्नास हजारापर्यंत मतदान घेतील मात्र साडेनऊ लाख मतदारात भाजपा कपिल पाटील, एनसीपीचे बाल्यामामा मात्रे ,अपक्ष निलेश सांबरे तिन्ही उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत.
भिवंडी ग्रामीण शहापूर मुरबाड मतदार संघात अपक्षांची घोडदौड सत्ताधारींना रोखण्याची तयारी करत असून कल्याण पूर्व भिवंडी मध्ये बरोबरीची लढत देण्यासाठी निलेश सांबरे यांनी सपा,एमआयएम ,काँग्रेस सह अनेक पक्ष संघटनेचे जाळे विणले पाठिंबा मिळविला त्यामुळे लढाई तिरंगी वाटते पण निवडणुकीच्या पेटीत दोघात खेळ असतो याचा अनुभव चार जूनला सर्वांना येणार आहे. सविस्तर राजकीय घडामोडीचा कल प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी यापूर्वी जाणून घेतला त्यानुसार बड्या बड्या नेत्यांना प्रचारात यावं लागलं.
देशाचे पंतप्रधान पासून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ,प्रदेशाध्यक्ष जेव्हा प्रचारात येतात तेव्हा मतदारात उत्साह असतो असा उत्साह फारसा मतदारा दिसून आलेला नाही तिन्ही उमेदवार त्यांची मताची आकडेवारी सर्व मतांची जुळवा जुळवा यातून नवा पर्याय निवडला जातो की पुन्हा सत्ताधारी गुलाल उधळतो हे बंद मतपेटी ठरवणार आहे कित्येक मतदारांपर्यंत उमेदवार कार्यकर्ते मतदान स्लिप पोहोचली नाही काहींना ग्रामपंचायतीला मिळालेला मानसन्मान मिळाला नाही तर काही कार्यकर्ते श्रेय वादातून गप्प बसल्याने ही निवडणूक जातीपातीच्या धर्तीवर नाही तर नशिबाच्या गुणावर असल्याचे मतदार सांगतात निवडणुकीनंतर कार्यकर्ते एकमेकांवर खापरे फोडणार असा वातावरण राजकीय पक्षात आहे.



No comments