सत्तेत बदल होताच मुरबाडच्या सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयात कामाचे टेंडर;बिले काढण्यासाठी गर्दी खोटी बिले फसणार...!
नामदेव शेलार / मुरबाड : भाजपा शिंदे गटाच्या सत्ता कालावधीत दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कामे केली नसताना बोगस मोजमाप पुस्तके एम बी तयार करून बिले मजुरीला पाठवली आहेत त्यांना अडथळा येवू नये यासाठी ठेकेदार कार्यकर्त्याची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात धावपळ सुरू झाले आहे. गेल्या वर्षी टेंडर काढले नसताना केलेल्या कामाचे टेंडर मुरबाड सार्वजनिक बांधकामात उपविभागाचे उपअभियंता शाखा अभियंता यांनी गेल्या महिन्याभरात काढून वाढीव दराने सर्व टेंडर आप-आपसात वाटून घेतले आहेत
यामध्ये भाजपा , शिवसेना श् शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा समावेश असुन नुकतेच सत्तेत आलेल्या राष्ट्रवादीचे अजितदादा पवार यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग खातं गेल्यास आपलं होडकं बुडेल यासाठी मुरबाड उपविभाग ठाणे सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता यांची धावपळ सुरू आहे. टक्केवारीची रक्कमा आगावू देण्यात आल्याचे काही ठेकेदार चर्चा करत असून आमच्या टेंडर कामाची बिले तात्काळ मिळवुन देण्यासाठी गटतटाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांना साकडे घातले आहेत.
मुरबाडच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केलेले रस्ते खड्डेमय बनले आहेत. गटारी, साईटपट्टी बनवलेली नाहीत कामे अपुर्ण असताना पुर्ण झाल्याचे दाखवून येत्या पावसाळ्यात त्याच कामाची नोंदी अतिवृष्टीने रस्ते खराब झाले म्हणुन शाखा अभियंता कडुन पुन्हा त्याच कामावर टेंडर काढण्याचा प्लॅन गेल्या ३० वर्षापासुन मुरबाड विधानसभा मतदार संघात सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाची कामे सत्तेत असलेल्या कार्यकर्त्यांना आमदार , खासदार मंत्री वाटप करतात त्यामध्ये शिंदेसेना , केंद्रीय मंत्री , स्थानिक आमदार यांचा ठेकेदारीत हिस्सा होता यापुढे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कामाची भागीदारी अधिका-यांना द्यावी लागणार असल्याने अधिका-यांनी टेंडर कामाचे पत्र वाटपाला सुरूवात केली आहे.



No comments