web-banner-lshep2024

Breaking News

शौचालयाचा स्लॅब कोसळून २ मुले जखमी; भाईंदर पश्चिमेच्या जय अंबे नगरमधील घटना


 

मिरा-भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेच्या एका सार्वजनिक शौचालयाचा स्लॅब कोसळून दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी घडली. जखमींमध्ये आठ वर्षांच्या मुलीचा व १४ वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. त्यांना उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे भाईंदर पश्चिमेला जय अंबे नगर परिसरात महापालिकेचे एक दुमजली सार्वजनिक शौचालय आहे.

   या शौचालयाच्या दुसऱ्या मजल्यावर स्वच्छता कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी खोल्या आहेत. या खोलीत आठ वर्षीय काफी व तिचा १४ वर्षांचा भाऊ समीर रविवारी दुपारी झोपले होते. यावेळी अचानक खोलीचा स्लॅब त्यांच्या अंगावर कोसळला. यात, काफी हिच्या डोक्याला, तर समीरच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. या दोघांना सुरुवातीला शासकीय जोशी रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले. परंतु, या रुग्णालयातील कर्मचारी संपावर असल्यामुळे दोघांनाही मुंबईतील शताब्दी रुग्णालयात पुढील उपचारांसाठी हलवण्यात आले.

No comments