web-banner-lshep2024

Breaking News

मुरबाड ग्रामीण रूग्णालयात 705 मलेरिया रूग्णांची नोंद डेंग्यु ,मलेरिया ,टायफाईड, गॅस्ट्रोच्या साथीने मुरबाड तालुका हारदला..!

 


नामदेव शेलार / मुरबाड : सालाबाद प्रमाणे मुरबाड तालुक्यात पहिल्याच पावसात मलेरिया टायफाईड डेंग्यु गॅस्ट्रो साथीच्या रोगानी थैमान घातला आहे.मुरबाड ग्रामीण रूग्णालयात 700 च्यावर मलेरिया रूग्णांची नोंद झाली असून त्यांच्यावर मुरबाड ग्रामीण रूग्णालयात उपौचार सुरू आहेत मुरबाड ग्रामीण रूग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिक्षिक डॉ.प्रसन्नाकुमार देशमुख यांनी मुरबाड ग्रामीण रूग्णालयात पाणी शुध्दीकरणाच्या मशनरी लावून रूग्णांना स्वच्छ पिण्याचे पाणी दिले आहे.ग्रामीण रूग्णालयातील डॉ.विश्‍वकर्मा ,डॉ.साबळे ,डॉ.पटेल ,डॉ.कुलत्ते रूग्णांवर तातडीने उपौचार करत आहेत.

      मुरबाड ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षिक डॉ.प्रसाद भंडारी यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी प्रभारी म्हणुन डॉ.प्रसन्नाकुमार देशमुख कार्यभार सांभाळत आहेत.मुरबाड तालुक्यात मुरबाड आणि टोकावडा दोन ग्रामीण रूग्णालय असून किशोर ,म्हसा, शिवळे, सरळगांव, धसई, शिरोशी ही छोटया शहरी करणाची प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत त्या परिसरात 40 ते 50 गांवे पाडया वाडयाचा समावेश असताना आरोग्य यंत्रणा औषध पुरवठा सुरळीत नसल्याने रूग्णांना टोकावडा मुरबाड दोन्ही ग्रामीण रूग्णालयात उपौचारासाठी जावं लागत आहे.

  तालुक्यातील धसई परिसरात तीघांचा डेंग्युच्या तापाने मृत्यु झाल्याचे सांगितले जात असताना निष्क्रीय तालुका आरोग्य अधिकारी डॉ.बनसोडे यांच्याकडे साथीच्या रूग्णांची नोंद नसल्याचे सांगत आहेत ग्रामीण भागात गेल्यावर्षी विंचू साप दंशाने तीन चार नागरिक शाळकरी मुलगी याचा उपौचाराअभावी मृत्यु झाला होता त्याची खबरदारी ग्रामीण रूग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिक्षिक डॉ.प्रसन्नाकुमार देशमुख यांनी मुरबाड ग्रामीण रूग्णालयात सर्प विंचू दशांची औषधे उपौचार उपलब्ध करून ठेवले आहे.तालुक्यातुन येणार्‍या सर्व रूग्णांवर तातडीने उपौचार केले जातात नागरिकांनी घाबरून जावू नये असे आहवान डॉ.प्रसन्नाकुमार देशमुख यांनी केले आहे.

      मुरबाड ग्रामीण रूग्णालयात दररोज चारशेच्यावर रूग्ण उपौचारासाठी येतात परंतु मुरबाडच्या ग्रामीण रूग्णांलय 30 बेडचाच आहे त्याला उपजिल्हा ग्रामीण रूग्णालयाची मंजुरी मिळाली नाही त्याचा फटका वैद्यकीय यंत्रणा तज्ञ डॉक्टर कर्मचार्‍यांची कमतरता भासत आहे.रूग्णालयात सोनोग्राफी तज्ञ नसल्याने आठवडयातुन फक्त एकच दिवस गुरूवारी गरोदर महिलांची सोनोग्राफी केली जाते त्यापलीकडे दुसर्‍या रूग्णांची तपासणी केली जात नाही तसेच एक्सरे काढणारे तज्ञ कर्मचारी नसल्याने रूग्णांना एक्सरे काढण्यासाठी खाजगी दवाखाण्याचा आधार घ्यावा लागत आहे.त्यामध्ये तातडीने सुधारणा करण्यासाठी प्रभारी वैद्यकीय अधिक्षिक डॉ.प्रसन्नाकुमार देशमुख यांनी वरिष्ठांना पत्रव्यवहार केला असुन सर्व रूग्णांवर उपौचर करणारी औषध भंडार गृहात उपलब्ध केल्याने गोर गरीब आदिवासी रूग्णांना दिलासा मिळाला आहे.

      मुरबाड ग्रामीण रूग्णालयात तज्ञ डॉक्टर नाहीत गरोदर महिलावर सिझरिंग करण्यासाठी मानहानावर डॉक्टराची नियुक्ती करण्यात आली असुन येथील डॉक्टराना सोयीसुविधा वाढीव पगार भत्ते दिल्यास ऑपरेशन यंत्रणा मशिनिरी सोयीसुविधा उपलब्ध केल्यास प्रत्येक रूग्णाला उपौचार मिळेल खाजगी महागडया रूग्णालयात उपौचारासाठी जावे लागणार नाही याकडे ठाणे जिल्हयाच्या मुख्यमंत्री ,पालकमंत्री ,आमदार ,खासदार, मंत्री ,लोकप्रतिनिधी लक्ष दयावे अशी मागणी येथील रहिवासीनी शासनाकडे केली आहे.

         तालुक्यात साथीच्या संसर्गजन्य रोगाचा प्रार्दुभाव करण्यासाठी गांवोगांवी आरोग्य पथकांनी उपौचार करण्याची गरज आहे जिल्हापरिषद आरोग्य अधिकारी मुरबाड तालुका आरोग्य अधिकारी गोर गरीबाना शासकीय आरोग्य सेवेचा लाभ देण्यास अपयशी ठरल्याने तालुक्यात डेंग्यु मलेरिया गॅस्ट्रो टायफाईड कुपोषित बालके गरोदर महिला जन्मता बालके सर्पदंश विंचू दंश क्षयरोग रूग्णांच्या मृत्युत दिवसे दिवस वाढ होत चालली आहे त्याच्या नोंदी तालुका स्तरावर नसल्याने मृत्युचा आकडा नेमका किती याची माहिती देण्यास आरोग्य अधिकार्‍यांनी टाळाटाळ केली आहे मुरबाड ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात स्थानिकांना उपौचार मिळत नसल्याचे बोलले जात आहे.

No comments