web-banner-lshep2024

Breaking News

पूरगस्तांना पुणे पोलीसांचा मदतीचा हात

BY - सुहास रेळेकर,युवा महाराष्ट्र लाइव - पुणे |
सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्हयांत मागील आठवडयात पूराने थैमान घातले.. अनेकांचे जीवलग, कष्टाने पुलविलेली शेती, धनसंपदा व घरे तुटताना.. गमावताना पाहण्याचे दुर्देव उभे ठाकले. पण इथला प्रत्येक नागरिक या संकटातून पुन्हा सावरण्याचा निश्चित प्रयत्न करेल, आपल्यांतील बऱ्याच पोलीस  अधिकारी व कर्मचाऱ्यांची नाळ याच कृष्णा, कोयना व पंचगंगेच्या खोऱ्यातील मातीशी जुळलेली आहे. आपणही आपला मदतीचा हात आपल्या पूरगस्त भावंडाना देऊन आपले कर्तव्य पार पाडू या. असे पोलीस आयुक्त, पुणे शहर. डॉ व्यंकटेशम,  यांनी पुढाकार घेऊन पुणे शहर पोलीसांच्या  माध्यमातून पूरग्रस्तांना तातडीची मदत देऊ करण्याचा मानस व्यक्त केला आहे.त्यासाठी प्रत्येक पुरगस्त कुटुंबासाठी खालील प्रमाणे नमूद घटकांचे १ पॅक देणे शक्य आहे.
*मिल्क पावडर - २५० ग्रॅम*
*पारले बिस्किट -  २५० ग्रॅम*
*मेणबत्ती - १२*
*तांदूळ - १ किलो*
*(तूर/ मूग ) डाळ - १ किलो*
*फरसाण / फुटाणे - २५० ग्रॅम*
*५ लि. पिण्याचे पाणी कॅन*वरीलप्रमाणे आपण आपल्या इच्छाशक्तीनुसार जास्तीत जास्त फूड पॅकेटस् विशेष शाखा, पुणे शहर येथे जमा करावीत. पूरगस्तांच्या मदतीसाठी मितेश घट्टे, पोलीस उपायुक्त, विशेष शाखा, पुणे यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. चंद्रकांत सांगळे ( सहा. पो. आयुक्त, विशेष शाखा - पुणे ) 9130165463 यांचेशी अधिक माहितीसाठी संपर्क साधावा.अशी विनंती करण्यात आली

No comments