web-banner-lshep2024

Breaking News

आता पूरग्रस्त नागरिकांना रोखीने मदत करणार

BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई |
पूरग्रस्तांना दिला जाणारा मदत निधी पीडितांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश सरकारने दिले होते. मात्र सरकारने आता हा निर्णय बदलला आहे. खरं तर बँकांमध्ये निधी जमा होणार असे म्हटल्यानंतर सरकारवर विरोधकांकडून टीका होत होती. आता सरकारने निर्णय बदलत पूरग्रस्त नागरिकांना रोखीने मदत करणार असल्याचे म्हटले आहे. सरकारकडून रोखीने मदत देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. जिथे नागरिकांना अडचण आहे तिथे रोखीने मदत मिळणार असल्याचे सांगितले आहे.

No comments