web-banner-lshep2024

Breaking News

मोहोळ येथे चौदा लाख किंमतीचे तंबाखू व पानमसाला भरलेली ९८ पोती जप्त

BY - यासीन आतार,युवा महाराष्ट्र लाइव – मोहोळ |
मोहोळ  पोलीस  स्टेशन  येथे   अन्न  व  औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी योगेश देशमुख यांच्या उपस्थितीत सदर पकडलेले  वाहन क्रं. २२,  ऊ  २२४७ या वाहनांची तपासणी केली असता  या वाहनात  पान - मसाला व सुगघित तंबाखू . साठा आढळून आला. व वाहन - चालक  रामसागर जवाहरलाल शर्मा , (क्य - ३२वर्ष) राहणार  मु- पो . मासिनाखास , तालुका धडाई  जी सिद्धार्थनगर ,  उत्तर प्रदेश ] याची चौकशी केली असता  हा सुंगधित  पानमसाला साठा  विजापूर ,कर्नाटक राज्य येथून  इंदोर ( मध्यप्रदेश ) येथे घेऊन जाणार असल्याचे सांगितले .व  वाहनांतील  मुद्देमाल याच्या समक्ष तपा- सणी केली असता त्यामध्ये  २६ पोते सुंगधित तंबाखू  याची अंदाजे किंमत  रुपये  ३, ६४००० , व  ७२ पोते  हिरा पातमसाला याची अंदाजे किंमत  १० लाख आठ हजार असा  tकूण  १३, ,७२००० हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित अन्नपदार्थ साठा आढळूत आला असता   वाहन  क्रं. घ-  २२  क्र २२७४  अंदाजे किमत  २०, ००,०० असा मिळून tकूण ३३, ७२०००  किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला . व सदर व्यक्ती आणि गुन्ह्यांतील साथीदार  याच्या विरोधात भारतीय दंड  संहिता कलम १८८,  २७२, .२७३ व ३२८  याप्रमाणे  अन्नसुरक्षा  व  मानके  कायदयाचे कलम  ५९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.सदरची कारवाई सुरेश देशमुख , सहायक आयुक्त पुणे विभाग , अन्न औषध प्रशासन यांच्या आदेशानुसार वसहाय्यक आयुक्त (अन्न ) प्रदीप  राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली  अन्न सुरक्षा अधिकारी योगेश देशमुख  यांनी पार पाडली.

No comments