web-banner-lshep2024

Breaking News

देवा ग्रुप फाऊंडेशनच्या माध्यमातून कल्याण अनाथाश्रमात साजरी केले रक्षाबंधन ; भावांना मिळाली बहिणींच्या मायेची सावली

BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
ज्या अनाथ मुलांना आर्इ वडिलांचा,बहिणींचा प्रेम मिळत नाही अशा मुलांच्या जीवन जगण्यात कुठे तरी तोजमय हरवतो आणि स्वतःला कुठे तरी कमी पडण्यातुन कोसण्याची वास्तुस्थिती निर्मान होते.अशा अनाथ मुलंच्या जीवनात कधतिरी देवाची लिला ही प्रकट होऊन त्यांनाही बाऊ,बहिणींच्या मायेच्या छ्रत्राखाली अंधारातुन प्रकाशाकडे जीवन जगण्याची धारणा निर्माण करून देते.
अनाथ मुलांनाही कुटूंब हवे असते परंतू त्यांच्या त्यांच्यातच कुटूंब तयार होते त्यामुळे खर्‍या प्रेमाच्या सावली व छत्रछायेपासून वंचित राहतात अशा अनाथ मुलांच्या जीवनात देवानी धूत पाठवले याचा साक्षात्कार आज कल्याण तालुक्यातील झुंझारराव मार्केट येथिल मानव चिल्ड्रन होम अनाथाश्रमात देवा ग्रुप फाऊंडेशनच्या माध्यमातून पाहण्यात आला.कल्याण विभागातील देवा ग्रुप फाऊंडेशन महिला विभागाच्या सदस्यांनी अनाथाश्रमातील 15 ते 16 मुलांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरे केले.
कधी भुकेपासून आतुर होतो तर कधी मायेपासून परंतू डोक्यावर जेव्हा कुटूंबाचा आशिर्वाद मिळतो तेव्हा जीवन सुखदाय होते.अशा कुटूंबाच्या मायेचा झरा देवा ग्रुप फाऊंडेशनच्या महिला सदस्यांनी जोपासून पुन्हा एकदा माणूसकी हिच खरी संपत्ती आणि आपुलकी हिच आमची परंपरा संस्कृती हे सिध्द केले आहे.
आज मानव चिल्ड्रन होम अनाथाश्रमातील लहान भावांना बहिणींच्या मायेची सावली मिळाली आहे.रक्षाबंधनाची डोर ही भावानी बहिणीचे प्रत्येक संकटापासून दुखःपासून रक्षण करण्याची असते परंतू येथे बहिणींनी आपल्या लहान भावांना राख्या बांधल्या आणि येणार्‍या प्रत्येक संकटासमोर सर्वप्रथम आम्ही पुढे असणार अशी शिकवण आज खर्‍य अर्थाने अनाथाश्रम मुलांसाबेत रक्षाबंधन सण साजरे करताना मिळाली.
बुध्दी लहान असो परंतू विचार हे दुसर्‍यांच्या हितासाठी आणि संकटकालीन उभे राहून व मायेच्या छत्रेखालचे हवे असे पुन्हा देवा ग्रुप फाऊंडेशनचे महाराष्ट्र सचिव तानाजीभाऊ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली देवा ग्रुप फाऊंडेशन कल्याण महिला विभागाचे जयु जाधव  व त्यांच्या महिला वर्गांनी सिध्द करून दाखवल्याने क्षण आनंदीचे अभिमानाचे असेच म्हणता येर्इल.यावेळी मानव चिल्ड्रन होम ला भेट देण्यात आली असता जयु जाधव ,स्वाती पवार,नेहा कांचरे,मनोरमा येरूनकर,वैष्णवी धारपावार,साक्षी ठोके,श्रृष्टी व इतर जणींनी राख्या बांधून आगळा वेगळा उपक्रम रक्षाबंधन सणाच्या माध्यमातून साजरा केला.त्यांच्या या उत्कृष्ठ विचाराने कल्याण तालुक्यासह संपुर्ण ठाणे जिल्हायात प्रशंसा व्यक्त केली जात आहे.


No comments