web-banner-lshep2024

Breaking News

पुरात अडकलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी मराठी सिनेसृष्टीतील कलाकारही उतरले

BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर आणि इतर भागात महापुराने थैमान घातले आहे. या पुरात अडकलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी आता मराठी सिनेसृष्टीतील कलाकारही उतरले आहेत. अभिनेता सुबोध भावे, जितेंद्र जोशी, रवी जाधव, कुशल बद्रिके, हार्दिक जोशी (राणादा), अभिजीत चव्हाण, विजू माने, संतोष जुवेकर यांनी पुरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे.
मराठी सिनेसृष्टीतील या कलाकारांपैकी काहींनी ठाण्यात 10 ते 14 ऑगस्टदरम्यान सिनेरसिकांना मदत करण्याचे आवाहन केलं आहे. याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. या मदत जमा करण्याच्या कामाविषयी बोलताना ‘चला हवा येऊ द्या’मधील कलाकार कुशल बद्रिके म्हणाला, “आम्ही कोणतीही चळवळ करत नसून आमची ही कृती म्हणजे जाणिवा जीवंत असलेल्या माणसांनी अडचणीत असलेल्या माणसांसाठी टाकलेलं एक पाऊल आहे. आता अशी हजारो पाऊलं एकत्र येत आहेत.” यासह रवी जाधव यांनी देखील हे संकट मोठं असल्याचं म्हणत शक्य ती मदत करण्याचे आवाहन केलं.

No comments