उल्हासनगर-4 सुभाष टेकडी येथील अशोकवन कॉलनीतील नागरिकांची स्थानिक नगरसेवकांकडे बोटीची मागणी
BY
- युवा महाराष्ट्र
लाइव – उल्हासनगर |
उल्हासनगर 4 सुभाष येथील
अशोकवन कॉलनीत दरवर्षी नाल्यातील पाणी लोकांच्या घरात जात असल्याचे चित्र दिसत आहे.दरवर्षी
नागरिकांची बोंब ही स्थानिक लोकप्रतिनिधीकडे असते मात्र नागरिकांच्या या समस्याकडे
स्थानिक लोकप्रतिनिधी यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
मात्र या सर्व घटनेनंतर आता
येथील रहिवासांनी चक्क स्थानिक लोकप्रतिनिधी नगरसेवक यांच्याकडे बोटीची मागणी केली
आहे.एवढा लोकांच्या घरात जात असून देखील प्रशासन
एवढा स्तब्ध का हे मात्र कळंनसे झाले आहे.रस्त्यावर तसेच गटारींवर होणारा खर्च निधी
दरवर्षी जातो कुठे कोणाच्या खिशात जातो
हे मात्र गुलदस्त्यात आहे.येथील समस्याकडे स्थानिक
लोकप्रतिनिधी जाणून बुजून दुर्लक्ष करतात का असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.येथील
समस्याचं निवारन जर लवकर झाले तर तिव्र आंदोलन
करू असा इशारा येथील रहिवासांनी दिला आहे.


No comments