web-banner-lshep2024

Breaking News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावर तिरंगा झेंडा फडकवला

BY - युवा महाराष्ट्र लाइव - नवी दिल्ली |
73 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावर तिरंगा झेंडा फडकवला. मोदी सरकारच्या दुसर्या टर्ममधील हा पहिलाच स्वातंत्र्यदिन आहे. त्यामुळे दुसर्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर मोदींचे हे लाल किल्ल्यावरील पहिले भाषण आहे.भारतीय जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत मोदींनी आपल्या भाषणाला सुरुवार केली. 
त्यांनी आपल्या भाषणात ट्रिपल तालक आणि कलम 370 चा देखील उल्लेख केला. कलम 370 आणि 35A हटविल्याने आपण सरदार पटेल यांच्या अखंड भारतच्या दिशेने वाटचाल सुरु केल्याचे सांगितले. आम्ही समस्या टाळत नाही. सरकार बनल्यानंतर केवळ 100 दिवसांच्या आत आम्ही कलम 370 व 35A हटविल्याचे मोदी यांनी सांगितले.

No comments