पूरग्रस्त भागात पिण्याचे शुद्ध पाणी, वीज, आरोग्य सुविधेसाठी यंत्रणांनी सतर्क राहण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
BY
- युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
राज्यात ज्या भागात पूर ओसरला आहे
तेथे पिण्याचे शुद्ध पाणी,आरोग्य सुविधा आणि वीज पुरवठा पुर्ववत करण्यासाठी यंत्रणांनी
सज्ज रहावे. पिण्याच्या पाण्याच्या नळ जोडण्या पुर्ववत करण्यासाठी तातडीने प्रयत्न
करावेत. दुर्गम भागात आदिवासी पाड्यांमध्ये तसेच पुरग्रस्तांसाठीच्या मदत छावण्यांमध्ये
अन्न धान्य, पिण्याचे पाणी आदि सुविधा पुरविण्यात याव्यात. रेल्वे यंत्रणेला
पाऊस आणि धरणांच्या विसर्गाबाबतची माहिती देण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे
दिले.राज्यात काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेली
पूर परिस्थिती यंत्रणांमार्फत सुरू असलेले मदतकार्य याबाबत मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री
अतिथीगृह येथे आढावा घेतला. यावेळी महसूल मंत्री
चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन,
मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख, पर्यावरण
मंत्री रामदास कदम, आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.



No comments