web-banner-lshep2024

Breaking News

पूरपरिस्थितीमध्ये पूरग्रस्तांना मदत करणाऱ्या व्यक्तींचा स्वातंत्र्य दिनानिमित्त वाडा तहसील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात सत्कार

BY - सुहास रेळेकर,युवा महाराष्ट्र लाइव – पुणे |

वाडा तालुक्यात वेळोवेळी उदभवलेल्या पूरपरिस्थितीमध्ये पूरग्रस्तांना मदत करणाऱ्या व्यक्तींचा स्वातंत्र्य दिनानिमित्त वाडा तहसील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात सत्कार उपविभागीय अधिकारी अर्चना कदम व तहसीलदार दिनेश कुऱ्हाडे यांच्या हस्ते करण्यात आला. 
यावेळी गांधरे येथील पूरग्रस्तांना मदत करणारे महेंद्र ठाकरे, विरेंद्र ठाकरे व त्यांचे सहकारी तर बोरांडे येथील मच्छीन्द्र पाटील व त्यांचे सहकारी, वाडा पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे व त्यांचे सहकारी यांचा सत्कार करण्यात आला. तर तालुक्यातील पूरपरिस्थितीमध्ये प्रशासनाला विशेष मदत करणारे, पूरपरिस्थितीत वृत्तांकन करून सोशल मिडियावर पूरपरिस्थितीची सातत्याने अपडेट देणारे पत्रकार रमेश पाटील, वैभव पालवे, जयेश शेलार, दिनेश यादव व युवराज ठाकरे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. दरम्यान आपात्कालीन परिस्थितीत काम करणारे पत्रकार, सोशल मिडिया ऍक्टिव्हिस्ट व कार्यकर्ते यांच्या वतिने आम्ही हा सत्कार स्वीकारल्याचे जेष्ठ पत्रकार रमेश पाटील यांनी सांगितले...

No comments