कोल्हापूर जिल्हयातील पुरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार कोल्हापूरला
BY
- सुहास रेळेकर,युवा महाराष्ट्र लाइव – पुणे |
या महापुरामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. महाराष्ट्राचे अर्थकारण अवलंबून असणारी ऊस शेती पूर्णतः खराब झाल्याने
केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करावी अशी मागणी राष्ट्रवादी
काँग्रेसचे सर्वेसर्वा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी पत्रकार बैठकीत केली. ते
कोल्हापूर जिल्हयातील पुरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कोल्हापूर आले असता त्यांनी
पत्रकार बैठक घेऊन या पुरपरिस्थितीबाबत आपले मत व्यक्त केले.
माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी कोल्हापूर
आणि सांगली या ठिकाणी दौरा करुन त्यांनी पूर परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी
पत्रकारांशी बोलताना मत व्यक्त केलं. पूर समस्येवर आता कायमची उपाय योजण्याची गरज असल्याचे
सांगून 2005 च्या पुराच्या वेळी जी पाणी पातळी
होती ती पाणी पातळी आता ग्राह्य धरणं चुकीचंच आहे. या महापुरात पश्चिम महाराष्ट्राचे
अर्थकारण अवलंबून असलेली ऊस शेती पूर्णतः खराब झाल्याने त्यांना कर्जमाफी दिली पाहिजे,असे
मत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केलं.
पूरग्रस्तांना सरकारने नवीन घरं बांधून दिली पाहिजेत. या घरांच्या बांधकामाचा दर्जाही
चांगला असला पाहिजे असंही शरद पवारांनी सुचवले. तर या महापुरामुळे शेतकऱ्यांचे झालेल्या
नुकसनाबाबत शेतकऱ्यांच्या समस्यांकडेही त्यांनी लक्ष वेधत पुरात ज्या शेतकऱ्यांचं नुकसान
झालं आहे, त्या शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारने पूर्ण कर्जमाफी दिली पाहिजे असे सांगितले. महापुरामुळे
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने
ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. 30 ते 35 टक्के गाळप कमी होणार आहे. नुकसानग्रस्त
ऊस उत्पादक शेतकऱ्याला हातभार लावण्यासाठी वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून
बियाणे उपलब्ध करून देऊन उसाची पुनर्लागवड करण्यात येईल त्यासाठी आपले प्रयत्न असून
यामुळे शेतकऱ्यांनाही थोडा हातभार लागेल अस राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी
सांगितलं.



No comments