पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शिवसेना कल्याण शहर शाखेची दहीहंडी रद्द
BY
- युवा महाराष्ट्र लाइव – कल्याण |
कल्याण शिवसेना कल्याण शहर शाखेच्या वतीने दरवर्षी आयोजित होणारा
दहीहंडी उत्सव यंदा रद्द करण्यात आला आहे. यावर्षी सांगली, कोल्हापूर, कोकणसह राज्यभरात विविध
ठिकाणी महापुराने हाहाकार उडवला. अनेकांचे बळी जाऊन कित्येकांचे संसार उघड्यावर आले.
त्यामूळे यंदाचा दहीहंडी उत्सव रद्द करून ती रक्कम पूरग्रस्तांना देण्याचा निर्णय घेण्यात
आल्याची माहिती शहरप्रमुख विश्वनाथ भोईर यांनी दिली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव
ठाकरे यांच्याकडे लवकरच ही रक्कम सुपूर्द केली जाणार आहे.



No comments