web-banner-lshep2024

Breaking News

पुरहाणी बाधित शेतकर्‍यांना बारवी डॅम अधिकार्‍याने शेती नुकसान भरपार्इ दयावी - मिलींद दळवी

BY - युवा महाराष्ट्र लाइव – उल्हासनगर |
सन 2005 साली झालेल्या महापुरत बारवीडॅमचे दरवाजे उघडल्यानेच आणे,भिसोळ,रायता,आपटी,मांजर्ली,वरप,कांबा,म्हारळसह अन्य गावांत पाणी शिरून घरे बुडाली होती.कोटी रूपयांचा घरगुती सामानांची नासधुस होऊन शेती,भाजपाला अन्य व्यवसायाचे नुकसान झाले होते.
          2005 सालाच्या पुरहाणीकडे शासनाने तसेच महाराष्ट्र औद्दयेगिक वसाहतीचे बारवीडॅम(धरण)अधिकार्‍यांनी दुर्लक्ष करून बारवी धरणाचा विसर्ग जाणार्‍या नदी किनार्‍या आनेगांव,भिसोळ,रायता,म्हारळ,वरप,कांबा,आपटी अन्य गावांचा पुनर्वसन तसेच शेती नुकसान भरपार्इकडे दुर्लक्ष केले त्याचा फटका 2019 च्या ऑगस्टमधील पुरहाणीत येथील गावांना बसला असून शेतकर्‍यांच्या मालमत्ता,घरे सामनासह शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.त्याला बारवीडॅम अधिकारी जबाबदार आहे.
          येत्या पुरहाणीत आणे,भिसोळ,रायता,आपटी परिसरातील शेतकर्‍यांचा शेती,भाजीपाला तसेच घरातील चिजवस्तु,अन्नधान्य यांचा झालेला नुकसान भरपार्इ,बारवीडॅम विभाग अधिकार्‍यांनी द्दयावी त्यांचा योग्य जागी पुनर्वसन करावे अशी मागणी विकासमंचाचे उपाध्यक्ष मिलींद दळवी,नामदेव शेलार यांनी केली आहे.
          बारवी धरणाची गत उंची पेक्षा पाच फुट उंची वाढवली आहे त्याचा फटका दरवर्षी येथील शेतकर्‍यांना बसणार असून धरणाखालील कालवा नदीच्या किनारे गावातील शेतकर्‍यांना नुकसान भरपार्इ देण्यात यावी अन्यथा शेतकरी तीव्र आंदोलन करतील असा इशारा दिला आहे.






No comments