web-banner-lshep2024

Breaking News

शिवाजी महाराजांच्या तत्वाने पोलिसानी काम करावे मुरबाड मध्ये भव्य पोलिस ठाणे वसाहत उदघाटण प्रसंगी उदगार

BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |

मुरबाड शिवाजी महाराजानी गोर गरीबांचे कैवारी म्हणुन काम केले रयतेचा राजा बनले त्यांचा पुतळा बसवला त्यांच्याच तत्वाने निर्णय घ्यावा लागले कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घेण्याचे संकेत मुरबाडच्या लोकप्रतिनिधी आणि मुरबाड पोलिसाना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुरबाड येथे दिले.
भव्य मुरबाड पोलिस ठाणे इमारत व कर्मचारी वसाहतसह शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्‍वरूढ पुतळयाचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते झाले त्यावेळी मुख्यमंत्री व्यासपिठावरून बोलत होते.पुतळा श्रध्दा म्हणून नको महाराजाना अपेक्षित असलेले काम करावे पुतळा लावला त्या तत्वावर निर्णय घ्यावे लागेल.पोलिस ठाण्यासमोर पुतळा असल्याने पोलिसानी कोणत्याही सामान्यावर अन्याय होणार नाही असे काम करावे छत्रपतींचे मावळे बिनपगारी उपाशी पोटी काम करत होते त्यातुन महाराजानी रयतेचे राज्य स्थापन केले हे तत्वनिष्ठ होते राज्याकरिता जीव देण्यास तत्पर होते शिवाजी महाराजानी सामान्याना मोठे केले पाहिजे हे शिकवले.त्यांच्या पर्यंत विकास पोहचला पाहिजे.उर्जा जागृत केली पाहिजे असे कार्यकर्ते प्रशासनाला वागण्याचा सल्ला दिला.

No comments