खड्डयात प्राण गमवावा लागलेल्या व्यक्तीच्या कुटूंबाला भरपार्इ मिळण्यासाठी देवा ग्रुप फाऊंडेशनचे भिवंडी तहसिलदारांना निवेदन ; मयत सतीश साखरे यांच्या कुटूंबियांना शासकीय मदत दिली मिळवून
BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – भिवंडी |
मुंबर्इ नाशिक द्रुतगती महामार्ग क्र.03 या महामार्गावर होणार्या वाहतुकी मुळे सदैव वर्दळीचा व तेवढयाच धोकादायकेचा बनला आहे.पावसाळयात या महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे रस्त्यात पडले असून अवजड वाहनांच्या वाहतुकीने सदरचे खड्डे अधिकाधिक मोठे होत आहेत.त्याचा परिणाम वाहतूक करणार्या वाहनचालकांवर होत आहे.त्यावर देवा ग्रुप फाऊंडेशनने लक्ष वेधले असून नुकत्याच शहापूर तालुक्यातील भादवड येथे राहणारे सतीश साखरे वय वर्षे (46) यांचे दि.07 जुलै 2019 रोजी आपल्या कामावर जात असताना सोनाळे ग्रामपंचायत हद्दीतील महामार्गावर पडलेल्या मोठया खड्डयात दुचाकी जावून तोल गेल्याने सतीश साखरे रस्त्यावर पडले असताना पाठीमागून येणार्या भरधाव कंटेनरने चिरडल्याने त्यांचा दुदैवी अपघात झाला.त्यांच्या कुटूंबात ते एकटेच कमवणारे होते.संपुर्ण कुटूंबाची जबाबदारी त्यांच्या खांदयावर होती परंतू दुदैवी अपघातात त्यांचे प्राण गेले.त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटूंबाची वाताहात झाली आहे.याकडे देवा ग्रुप फाऊंडेशनने लक्ष वेधून सदरहू अपघाताला जबाबदार मुंबर्इ नाशिक महामार्गाचे संबंधित अधिकारी जबाबदार असून त्यांच्या निकृष्ठ आणि दुरूस्ती राखण्याची यंत्रणा निकामी असल्याने त्यांच्या या हायगय व दुर्लक्षतेमुळेच सदरचा अपघात झाला आहे असे देवा ग्रुप फाऊंडेशनने पत्राद्वारे संतप्त व्यक्त केला आहे अशा संबंधित अधिकार्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करून मयत सतीश साखरे यांच्या कुटूंबियांस 15 लाखाची नुकसान भरपार्इ द्दयावेत अशी मागणी देवा ग्रुप फाऊंडेशनने लेखी पत्राद्वारे भिवंडी तहसिलदार,राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांचेकडे केली आहे.तसे न झाल्यास 10 दिवसात आपल्या विरोधात उग्र आंदोलन करण्यात येर्इल असेही सांगण्यात आले होते.अशा गांभिर्य बाबीकडे देवा ग्रुप फाऊंडेशनच्या एका पत्राने लक्ष वेधून काढले असता मयत सतीश साखरे यांच्या कुटूंबियांना 15 लाखाची मदत करण्यात आली आहे.त्यामुळे देवा ग्रुप फाऊंडेशनचे अध्यक्ष सुजितशेठ ढोले,महाराष्ट्राचे लाडके तथा देवा ग्रुप फाऊंडेशनचे सचिव तानाजीभाऊ मोरे,कार्याध्यक्ष सुरेंद्र गुळवी,उपाध्यक्ष संदीप ठाकरे,संघटक रवि पाटील अन्य देवा ग्रुप फाऊंडेशनच्या पदाधिकार्यांनी खर्या माणूसकीची जाण राखत सामाजिक कार्य करून देवा ग्रुप फाऊंडेशनची साथ सदैव आपल्या सोबत असल्याचे सिध्द केल्याने साखरे कुटूंबियांनी देवा ग्रुप फाऊंडेशनचे आभार मानले आहेत.



No comments