web-banner-lshep2024

Breaking News

पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी पोलीस दलातून स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज दिला

BY -  युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
एन्काउंटर स्पेशलिस्ट अशी ओळख असणाऱ्या पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी पोलीस दलातून स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज दिला आहे. 4 जुलै रोजी त्यांनी आपला राजीनामा दिला आहे. मात्र अद्याप स्वीकारला गेलेला नाही. प्रदीप शर्मा ठाणे गुन्हे शाखेत कार्यरत होते. त्यांच्या राजीनाम्यानंतर ते आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा आहेत. महत्त्वाचे म्हणजे शर्मा हे आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना किंवा भाजप युतीचे उमेदवार असू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे.


No comments