मोहोळ नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी व कर्मचारी यांच्या ढिसाळ नियोजनामुळे सफाई कामगारांवर उपासमारीची वेळ
BY
- यासिन आत्तर,युवा महाराष्ट्र लाइव – मोहोळ |
मोहोळ नगर परिषदेच्या सफाई कामगार यांचे गेल्या चार महीन्यापासुन पगार नसल्याने उपासमार सुरू आहे पगारासाठी त्यांनी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे मोहोळ नगर परिषदेच्या सफाई कर्मचारी यांचा गेल्या चार महीन्यापासुन पगार दिला नसल्याने त्यांची आणि कुटूंबाची मोठी उपासमार सुरू आहे पगार तातडीने मिळावा म्हणुन सफाई कामगार त्यांनी आता आंदोलनाचा इशारा दिला आहेसफाई कामगाराच्या असहकार्याच्या भुमिकेमुळे गावातील गटारी तुबंल्या आहेत त्याचे पाणी रस्त्यावरुन वाहुन जात असल्याने नागरीकांचा आरोग्याचा प्रन्न निर्माण झाला आहे . तर गावातील चौकाचौकात कचऱ्याचे ढिकारे ठिकठिकाणी साठले आहेत त्याची दुगर्धा सर्वत्र पसरत आहे कचऱ्याचे डब्बे कचरा न उचलल्याने भरून वाहु लागले आहेत त्यामुळे सर्वत्र पुन्हा घाणीचे साम्राज्य पसरले आहे सफाई कर्मचारी यांचे पगार न करण्याचे कारण नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी एन के पाटील यांनी सांगितले की आम्ही सफाईसाठी चा ठेका दिला असुन ठेकेदाराने त्यांचा पगार दिला नाही यात आमचा काय दोष ठेकेदाराचे पैसे दिले नसल्यास त्याचे पैसे आम्ही उपलब्ध झाल्यास त्वरीत देवू मात्र यासाठी आम्हाला कामगारांनी वेठीस धरु नये त्यांनी त्यांची कामे करावीत पगार मिळताच त्वरीत देऊ



No comments