web-banner-lshep2024

Breaking News

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूरग्रस्त भागात जावून देखील पाहणी न करता थेट पुढे गेल्याने पूरग्रस्तांच्या जखमेवर तिखटमीठ चोळण्याचा प्रकार

BY - सुहास रेळेकर,युवा महाराष्ट्र लाइव – बदलापूर |

काल उल्हास नदीने गाठलेल्या धोक्याच्या पातळीनंतर बदलापूरआणि परिसरातील  बहुतांश भाग हा पुरामुळे बुडाला होता  गेल्या तीन दिवसांपासून बदलापूर आणि परिसरातील येथील तितकी मदतही नसल्याने येथील नागरिक पूरस्थिती मुळे त्रासले  होते.
अशातच बदलापूरातून मुख्यमंत्र्यांचा ताफा हा मुरबाडच्या दिशेने दुपारी सव्वादोनच्या सुमारास सायरन वाजवत गेला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्त भागात जावून देखील पाहणी न करता थेट पुढे गेल्याने पूरग्रस्तांच्या जखमेवर तिखटमीठ चोळण्याचा प्रकार झाल्याने पुरग्रस्ताच्या भावना दुखावल्या  आहेत. येथील नागरिक शासनाच्या मदतीच्या अपेक्षेवर अवलंबून आहेत.मुख्यमंत्री फडणवीस हे मुरबाडला एका शासकीय उद्घाटनासाठी गेले आहेत. ते येताना बारवी डॅम येथे देखील जलपूजनाच्या कार्यक्रम झाल्यानंतर पुन्हा त्याच मार्गे बदलापूर वरून डोंबिवलीकडे जाणार आहेत. त्यामुळे येताना तरी मुख्यमंत्र्यांनी बदलापुरातील पूरग्रस्त परिस्थितीचा आढावा घेऊन तातडीने मदत जाहीर करावी अशी मागणी आता पूरग्रस्तांनाकडून होत आहे. 

No comments