web-banner-lshep2024

Breaking News

मोदी सरकारच्या 100 दिवसांच्या कामाचा रिपोर्ट कार्ड येणार

BY - युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली |

लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने सर्वांत मोठा विजय मिळवला. यानंतर पंतप्रधान मोदींनी दुसऱ्यांदा सरकार स्थापन केले. आता मोदी सरकारला 100 दिवस पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून कामाचं रिपोर्ट कार्ड जारी करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. या रिपोर्टमध्ये नवीन प्रकल्प तसेच महत्वाकांक्षी प्रकल्पांचे अपडेट दिले जातील. यासोबतच जनतेला मंत्र्यांच्या कामाचा रिपोर्ट मिळावा यासाठी मोदींनी एक वेगळाच प्लान आखल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. यानुसार दर महिन्याला मंत्र्यांना त्यांच्या कामाचा आढावा जनतेसमोर सादर करावा लागणार आहे.पंतप्रधान कार्यालयाकडून सर्व मंत्रालयाच्या सचिवांना आपल्या विभागाच्या कामांचा अहवाल तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये तीन गोष्टींवर जास्त लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. यामध्ये एखाद्या योजनेसाठी किंवा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कोणते लक्ष्य ठरवण्यात आले आहे. प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. यासोबतच प्रकल्प काय, केव्हा आणि कधी पूर्ण होणार याची संपूर्ण माहिती देणं बंधनकारक आहे. मोदी सरकारअंतर्गत प्रत्येक प्रकल्पावर लक्ष ठेवण्यासाठी 10 ग्रुप ऑफ सेक्रेटरी आहेत. ते वारंवार पंतप्रधान कार्यालयाशी संपर्कात राहणार आहेत.

No comments