रमजान ईदनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
राज्यातील मुस्लिम बांधवांना रमजान ईद (ईद-उल-फितर)
निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.मुख्यमंत्री
आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात, रमजान महिन्याच्या समाप्तीनंतर येणारा रमजान ईद हा
सण आनंद आणि उत्साहाचा आहे. माणसा-माणसांतील प्रेम वृद्धिंगत करणाऱ्या या सणाच्या माध्यमातून
समाजातील बंधुभाव वाढीस लागेल. या सणाच्या निमित्ताने वंचित-उपेक्षितांना सहाय्य करून
त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी होणारा प्रयत्न निश्चितच सामाजिकता जोपासणारा आहे.



No comments