web-banner-lshep2024

Breaking News

बॉलिवूड अभिनेत्रीचं शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त ट्विट, सोशल मीडियावर टीकेची झोड

BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
बॉलिवूड अभिनेत्री पायल रहतोगीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त ट्विट केले आहे. तिच्या या वादग्रस्त विधानामुळे सोशल मीडियावर तिच्यावर टीकेची झोड उठली आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज क्षत्रिय कुळाचे नसून त्यांचा जन्म शूद्र जातीत झाला आहे’ असे वादग्रस्त वक्तव्य तिने केले आहे. यासोबतच शिवाजी महाराज आणि मराठा आरक्षणावर आपलं मत देत तिने मुक्ताफळे उधळली आहेत.

पायलने तिच्या ट्विटरवर छत्रपती शिवाजी महाराजांचा एक फोटो पोस्ट केला. यासोबत तिने लिहिले की, ‘शिवाजी महाराज हे मूळ क्षत्रिय कुळाचे नाहीत, तर त्यांचा जन्म शूद्र जातीत झाला होता’, असं तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. ट्विटरसोबतच तिने इन्स्टाग्रामवरही अशीच पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टमुळे सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.

No comments