स्वामी विवेकानंद स्कूलच्या इंग्लिशमध्ये असलेल्या संपुर्ण माहिती नावाची पाटी मराठीमध्ये लावण्यासाठी मनविसेचे शाळेला पत्र
BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
महाराष्ट्रात मराठी असल्याचे अभिमान बाळगून जसे प्रत्येक देशाला आपल्या भाषेचा अभिमान असतो तसेच भारत देशाच्या महाराष्ट्रात मराठी भाषेचा अभिमान असलाच पाहिजे असे राजसाहेब ठाकरे यांचे मुख्य उद्देश डोळयासमोर ठेऊन मराठी भाषेच्या सन्मानार्थ मुरबाड शहरातील स्वामी विवेकानंद स्कूलच्या इंग्लिशमध्ये लावण्यात आलेल्या शालेय नावाच्या पाटीची संपुर्ण माहिती ही मराठी मध्ये लावण्यात यावी असे महाराष्ट्र नवनिर्माण विद्दयार्थी सेना मुरबाडच्या वतीने शालेय मुख्यध्यापिकांना निवेदनाद्वारे कळविण्यात आले असून आठ दिवसात आपण शालेय नावाची संपुर्ण माहिती ही मराठीमध्ये लिहावे तसे न केल्यास मनविसे मुरबाड यांचेकडून आंदोलन छेडले जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.यावेळी शहाराध्यक्ष देवेंद्र अशोक जाधव यांनी मुख्यध्यापिका यांची भेट घेऊन निवेदनपत्र दिले,यावेळी समीर शेख,नरेश माळी तसेच अन्य मनविसे चे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.


No comments