web-banner-lshep2024

Breaking News

औद्योगिक शहर वायू प्रदूषणात राज्यात पहिल्या, तर जगात पहिल्या चारमध्ये समाविष्ट

BY - युवा महाराष्ट्र लाइव – डोंबिवली |
चंद्रपूर जिल्ह्याच्या चारही बाजूंनी असलेल्या कोळसा खाणी, वीज केंद्र, सीमेंट प्रकल्प, कच्चा लोहनिर्मितीचे कारखाने यामुळे चंद्रपूर नेहमीच प्रदूषणात आघाडीवर राहिलेला जिल्हा आहे. याच जिल्ह्यातील घुग्घुस हे चंद्रपूरपासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावरील औद्योगिक शहर वायू प्रदूषणात राज्यात पहिल्या, तर जगात पहिल्या चारमध्ये समाविष्ट आहे. डोंबिवली दुसऱ्या, तर चंद्रपूर तिसऱ्या क्रमांकावर आहे. घुग्घुस येथे सभोवताल कोळशाच्या खाणी, सिमेंट उद्योग आणि आयर्न ओरचे कारखाने आहेत. कोळसा असल्याने त्यांची साठवणूक, वाहतूक इथल्या रस्त्यातूनच केली जाते. लॉयड मेटल्स नावाचा लोह कारखाना दिवसरात्र काळाकुट्ट धूर ओकत असतो. त्यामुळे येथील घरे पूर्णपणे काळवंडली आहेत. हे प्राथमिक आरोग्य केंद्र बघितल्यास या प्रदूषणाची कल्पना येते. हे आरोग्य केंद्र आतून-बाहेरून पूर्णपणे काळकुट्ट झाले आहे. काळ्या भुकटीचा थर येथे साचला आहे. शहरातील घरांची अवस्था यापेक्षा वेगळी नाही. येथील रस्तेही काळेच आहेत. त्यातून उठणारी धूळही काळीच. त्यामुळं जीव मुठीत घेऊन येथे राहणाऱ्या नागरिकांना जगावे लागत आहे.



No comments