web-banner-lshep2024

Breaking News

जेष्ठ अभिनेते दिनयार कॉन्ट्रेक्टर यांची निधन

BY - युवा महाराष्ट्र लाइव –  मुंबई |
बाजीगर, खिलाडी, 36 चायना टाउन, बादशाह सारख्या सुपरहिट सिनेमांमध्ये झळकलेले वरिष्ठ अभिनेते दिनयार कॉन्ट्रेक्टर यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. वयाच्या 79 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते दीर्घकाळापासून आजारी होते. मुंबईच्या वरळी येथे संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पद्म पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यांनी अनेक टीव्ही शोजसोबतच गुजराती आणि हिंदी थिएटरमध्ये काम केले. दिनयार यांनी आपल्या अॅक्टिंग करिअरची सुरुवात एक थिएटर आर्टिस्ट म्हणून केली होती. यानंतर त्यांनी हिंदी सिनेमांमध्ये आपले नशीब आजमावले. यामध्ये ते यशस्वीही ठरले.दिग्गज अभिनेते दिनयर कॉन्ट्रेक्टर यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत दुःख व्यक्त केले आहे. पंतप्रधान मोदींनी आपल्या ट्विटर हँडलवरुन दिनयर कॉन्ट्रेक्टर यांच्यासोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, ‘पद्म श्री दिनयर कॉन्ट्रेक्टर खूप स्पेशल व्यक्ती होते, कारण ते सर्वांमध्ये आनंद वाटत होते. त्यांच्या अभिनयाने सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य येत होते. थिएटर, टेलीव्हिजन, सिनेमा प्रत्येक ठिकाणी त्यांनी चांगले काम केले. त्यांच्या जाण्याने मला दुःख झाले आहे. मी त्यांच्या कुटूंब आणि मित्रांसोबत आहे.’




No comments