कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना पेरणीपूर्व मशागतीचे मार्गदर्शन;आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरासंदर्भात केले जातेय पुरंदर तालुक्यात मार्गदर्शन
BY
- युवा महाराष्ट्र लाइव – पुणे |
आता थोड्याच दिवसात पावसाळा सुरू होतोय. पावसाळा
म्हटल की शेतीच्या कामाची सुरवात होते. याच दिवसात म्हणजे रोहिणी नक्षत्रात शेतीच्या
पेरणी पुर्वी मशागतीची कमे केली जातात. यावर्षी पाउस लांबला आहे.
त्यामुळे शेतकरी शांत आहे. परंतु पुरंदर मधील कृषी विभाग मात्र जोमाने कामाला लागलाय,
कृषी विभागाच्यावतीने उन्नती शेती समृद्ध शेतकरी या कार्यक्रमांतर्गत रोहिणी पंधरवड्याला
साजरा केला जातोय.पुरंदर तालुक्यातील कृषी अधिकारी व कृषी सेवक गावो गावी जावून शेतक-यांना पेरणीपूर्व मशागतीची माहिती देतायत.
चांगल्या प्रतीचे बीज कस निवडावं, विकत आणलेले बीयांण कस वापराव, बी खराब लागल्यास
काय करावं, त्याच्यासाठी सॅम्पल राखून कसे ठेवावे, बिजावर जिवाणू प्रक्रिया कशी करावी,
कमीत कमी खतांच्या वापरात पीक कसे घ्याव, शेतीमध्ये सेंद्रिय खताचा वापर कसा वाढवावा
या व अशा अनेक बाबींची माहिती यामध्ये शेतकऱ्यांना देण्यात येत आहे.


No comments