पंतप्रधान नरेंद्र मोदी जापान दौऱ्यावर
BY - युवा महाराष्ट्र
लाइव – नवी दिल्ली |
पंतप्रधान नरेंद्र मोदी G-20 संमेलनात सहभागी
होण्यासाठी जापानच्या ओसाकामध्ये पोहोचले आहेत. ओसाका एअरपोर्टवर यावेळी मोदी मोदीच्या
घोषणा देण्यात आल्या. दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा पहिला
मोठा कूटनीतिक दौरा आहे. जापानच्या ओसाकामध्ये गुरुवारपासून जगातील सर्वात
शक्तिशाली 20 देशांचे संमेलन सुरू होत आहे. मोदी आज मेजबान पंतप्रधान शिंजो आबे यांची
भेट घेणार आहे. यामध्ये आपसातील व्यवहारांसोबतच महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची
शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प
यांची भेट घेणार आहेत.
पंतप्रधान
नरेंद्र मोदींचे ओसाका विमानतलावर जोरदार स्वागत करण्यात आले. मोदी-मोदीसोबतच भारत
माता की जय आणि वंदेमातरमच्या घोषणा देण्यात आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी जापानचे
पंतप्रधान शिंजो आबे यांच्या भेटीनंतर साडे तीन वाजचा भारतीय समुदायातील लोकांना भेटतील.
जी-20 संमेलनात रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, महिला सशक्तिकरण,
डिजिटलाइजेशन आणि लवायु परिवर्तन सारक्या मुद्द्यावर विशेष चर्चा होणार आहे. पंतप्रधान
मोजी जी-20 संमेलनात 10 द्विपक्षीय बैठक करणार आहे.



No comments