कल्याण शहरातील सर्वात जुन्या अनुराग नाट्यसंस्थेचा 45वा वर्धापनदिन साजरा
BY - युवा महाराष्ट्र
लाइव – कल्याण |
कल्याण शहरातील सर्वात जुन्या असलेल्या अनुराग
नाट्यसंस्थेचा 45 वा वर्धापनदिन सोहळा नुकताच आचार्य अत्रे नाट्यगृहात रसिकांच्या उदंड
उपस्थितीत पार पडला.अनुराग नाट्यसंस्थेच्या 45व्या वर्धापन सोहळयाप्रसंगी प्रमुख पाहुणे
म्हणून आ. नरेंद्र पवार व ज्येष्ठ पत्रकार तुषार राजे यांच्यासह संस्थेचे उदय वैदय,
मेघन गुप्ते उपस्थित होते. आपणही अनुरागचे विद्यार्थी असल्याचा अभिमान आहे असे आमदार
नरेंद्र पवार यांनी सांगितले. अनुरागच्या 45 वर्षाच्या वाटचालीचे आपण साक्षीदार आहोत
अशी माहिती पत्रकार तुषार राजे यांनी दिली.
याप्रसंगी
संस्थेच्या संगीत विभागातर्फे विद्या निकेतन संगीत विद्यालयाच्या सौ. केतकी बोरवणकर,
अनिषा ठिगळे, निशिता खळदे यांचे शुध्द शास्त्रीय कथ्थक नृत्य अत्यंत सुंदरपणे सादर
करण्यात आले. कथ्थक पढंत कविता अहिरे-बिऱ्हाडे यांनी केले. त्यानंतर सौ. शर्वरी धामापुरकर,
रोजन मेढी, सुकांत जावडेकर यांचे बहारदार गायन झाले. त्यांना तबला साथ स्नेहल धामापुरकर,
हार्मोनियम अनिरुध्द गोसावी व साईड रिदम ओमकार जोशी यांनी साथ दिली. संस्थेचे अध्यक्ष
मेघन गुप्ते यांनी प्रास्ताविक सादर करुन संस्थेच्या 45 वर्षातील कार्याचा आलेख सादर
केला. कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण निवेदन सौ.
प्राची गडकरी यांनी तर आभारप्रदर्शन अभिनेत्री धनश्री ढोमसे यांनी केले.अनुराग संस्था
गेली 45 वर्षे राज्य, देश व विदेश पातळीवर विविध कार्यक्रम व उपक्रम सातत्याने आयोजित
करीत असते.



No comments