web-banner-lshep2024

Breaking News

भारतीय हवाई दलाचे AN-32 विमान बेपत्ता

BY - युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली |

भारतीय हवाई दलाचे AN-32 हे विमान आसामच्या जोरहाटवरुन उड्डाण केल्यानंतर अचानक बेपत्ता झालं आहे. या विमानामध्ये पाच प्रवासी आणि आठ कर्मचारी असे एकूण 13 जण आहेत. भारतीय हवाई दलाकडून सध्या या विमानाचा शोध घेतला जात आहे.एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय हवाईदलाचे AN-32 बनावटीचे विमानाने आज दुपारी 12.25 वाजता आसामच्या जोरहाटवरुन उड्डाण केलं. यानंतर अरुणाचल प्रदेशामधील मेंचुका एअर फील्डवरुन हे विमान बेपत्ता झाले. या विमानाशी दुपारी 1 वाजता शेवटचा संपर्क झाला. मात्र त्यानंतर अजूनही या विमानाशी कोणताही संपर्क झालेला नाही. त्यामुळे हवाई दलाकडून शोध मोहीम सुरु करण्यात आली आहे.

No comments