मोदीचेच सरकार पुन्हा सत्तेत येईल मात्र त्याना विरोधी पक्षाच्या प्रचंढ त्रासाला सातत्याने सामोरे जावे लागेल - परमपूज्य राजेंद्र खर्गे महाराज
BY
- यासिन अत्तर,युवा महाराष्ट्र लाइव – मोहोळ,सोलापुर
देशाच्या राजकारणात प्रचंड घुसळण होऊन , विचार मंथनाने पुन्हा मोदीचेच
सरकार पुन्हा सत्तेत येईल मात्र त्याना विरोधी
पक्षाच्या प्रचंढ त्रासाला सातत्याने सामोरे जावे लागेल अशी भाकणुक मोहोळ येथील नागनाथ महाराजांच्या यात्रेत नागनाथाचे
मानकरी परमपूज्य राजेंद्र खर्गे महाराज यांनी केली भाविकांचे श्रद्धा स्थान असणाऱ्या
मोहोळ येथील श्री नागनाथ महाराजांच्या यात्रेत
मुख्य आर्कषण असणाऱ्या गणासह,पालखीची
सवाद्य मिरवणुक काढण्यात आली. यावेळी श्री नागनाथ महाराजांचे
मुख्य मानकरी राजेंद्र खर्गे महाराज यांच्यात वायु रूपाने संचार होवून पालखीसह मिरवणुक
निघाली. यावेळी मंदिराच्या मुख्य दरवाजात देशातील
परिस्थितीवर वरील भाकणुक करण्यात आली.खर्ग तिर्थामध्ये नागनाथाचे मानकरी राजेंद्र खर्गे
महाराज व अरुणबुवा मोहोळकर यांचा गुरु शिष्य भेटीचा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी भर
उन्हात महिलां, मुलांसह नागेश भक्तांनी खर्ग तिर्थावर हजारो भावीक भक्तांनी मोठी गर्दी
केली होती. खर्ग तिर्थाकडून त्यानंतर काकडे पार, मुंगीचा धोंडा या ठिकाणीही शेती पाणी
याविषयी भाकणूक झाली. त्यामध्ये पाऊस समाधानकारक पडेल पिके चंगाली येतील पुरेशा अन्न
धान्य मिळेल अशी भाकणुन झाली त्यानंतर ही मिरवणूक मंदिरात गेली त्याठिकाणी हजारो भक्तांच्या उपस्थितीत
आरती होऊन प्रसादाचे वाटप करण्यात आले यात्रा व्यवस्थित पार पडण्यासाठी देवस्थान पंचकमिटी
चे सर्व सदस्य ग्रामस्थ आदींनी परिश्रम घेतले.



No comments