web-banner-lshep2024

Breaking News

तारापूर एमआयडीसीतील एस्क्वायर केमिकल प्लांटमध्ये वायुगळती होऊन तीन कामगारांचा मृत्यू

BY - युवा महाराष्ट्र लाइव – पालघर |
तारापूर एमआयडीसीतील एस्क्वायर केमिकल प्लांटमध्ये वायुगळती होऊन तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. केमिकल कंपनीत रासायनिक प्रक्रिया सुरु असताना विषारी वायूची गळती झाल्याने हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एस्क्वायर (esquire) केमिकल कंपनीमध्ये वायुगळती झाल्याने तीन कामगारांना त्रास होऊ लागला होता. त्यानंतर या सर्व कामगारांना औद्योगिक क्षेत्रातील तुंगा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारापूर्वीच या कामगारांचा मृत्यू झाला होता. प्रभाकर खडसे (मॅनेजर), दत्तात्रय घुले (ऑपरेटर), रघुनाथ गोराई (कामगार) अशी मृत कामगारांची नावे आहेत.या रासायनिक वायूची तीव्रता एवढी होती की, रुग्णालयातील इतरांनाही त्याचा त्रास जाणवू लागला. कामगारांच्या मृतदेहाची तपासणी करीत असताना डॉक्टरांनाही चक्कर आल्याचंही समोर आलं आहे.



No comments