web-banner-lshep2024

Breaking News

अखिल भारतीय अग्रवाल संमेलनाची पूर्व योरोपची सामूहिक आंतरराष्ट्रीय सहळ;९३ सदस्यांमध्ये अनेक वरिष्ठ नागरिकांचाही समावेश

BY - मन्साराम वर्मा,युवा महाराष्ट्र लाइव - ठाणे |

विविध सामाजिक कार्यांसह सातत्याने सार्वजनिक- लोकाभिमुख उपक्रमांमध्ये अग्रगण्य असलेल्या अखिल भारतीय अग्रवाल संमेलन या संस्थेच्या वतीने अलीकडेचपुर्व योरोपची सामूहिकआंतरराष्ट्रीय सहळ आयोजित करण्यात आली होती. सदर पुर्व योरोपीयन दौऱ्यात संस्थेच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष शिवकांत खेतान, राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र अग्रवाल, महाराष्ट्र अध्यक्ष अनुप गुप्ता आणि राष्ट्रीय सचिव सुमन अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील चमुत ९३ जणांचा समावेश होता. या सहळीत मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक देखील सामील झाले होते. संस्थेच्या मते, या सहळीमागे त्यांचा मुख्य हेतूच असा होता की असा प्रकारे ज्येष्ठ नागरिकांचीही परदेस प्रवास करण्याची इच्छा पूर्ण करण्यात यावी, जे प्रवास त्यांना एकटे करणे शक्य नाही. ११ दिवसांच्या या प्रवासादरम्यान, या संस्थेच्या कार्यसंघातील सदस्यांनी सेंट पीटर्सबर्ग, मॉस्को, ताशकंद आदि क्षेत्रांतील ब-याच नैसर्गिक-सांस्कृतिक-ऐतिहासिक वैभव-वारसाचा आनंद तर घेतलाच, संस्थेच्या कायमस्वरूपी ठरलेल्या पद्धतप्रमाणे तेथील जवळपासच्या परिसरात वास्तव्यास असलेल्या अग्रवाल समाजातील लोकांशी संपर्क साधून त्यांचे मनोगतही जाणून घेतले. आंतरराष्ट्रीय सहळीला गेलेल्या संस्थेच्या या चमूत मुंबई-ठाणे, नाशिक, पुणे आदी क्षेत्रांसह लंडनची लोकंही सामील झाली होती.

No comments