web-banner-lshep2024

Breaking News

अकोल्यात 20 लाखांचा गुटखा साठा जप्त

BY - युवा महाराष्ट्र लाइव - अकोला |

परराज्यातून अकोल्यात ट्रकमध्ये पोत्यात भरून आणण्यात येणारा सुमारे वीस लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला आहे. अकोला जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने आज सकाळच्या सुमारास ही कारवाई केली.या कारवाई दरम्यान, एक ट्रक दोन पिकअप वाहनासह राज्यात बंदी घातलेला 20 लाख रुपयांचा प्रतिबंधीत गुटखा साठा जप्त केला आहे. या मुद्देमालाची एकत्रित किंमत जवळपास 60 लाख अशी आहे. पोलिसांनी या प्रकरणी आठ जणांना रंगेहात अटक केली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. अकोल्यातील दगडी फुल परिसरात जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमुख मिलिंदकुमार बहाकार यांनी सापळा रचून हि कारवाई केली आहे. या धडक कारवाईमुळे गुटखा माफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

No comments