गृहनिर्माण संस्थांच्या मदतीने मतदार नोंदणीचा वेग वाढवून सर्वाना समाविष्ट करून घेणार – जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर
BY
- कुणाल शेलार, युवा महाराष्ट्र लार्इव्ह - ठाणे
एक जानेवारी २०१९
या दिनांकाची मतदार यादी अर्हता यादी म्हणून ग्राह्य धरली जाणार असून या यादीतील
मतदारांना आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्याची संधी मिळणार
आहे, त्यामुळे येणाऱ्या ३१ ऑक्टोबरपर्यंत मतदार नोंदणी करून घ्यावी. त्यानंतर देखील
मतदान नोंदणीची प्रक्रिया सुरूच राहील परंतू ती नावे पुरवणी यादीत समाविष्ट होतील
असे काल जिल्हा निवडणूक विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. जिल्ह्यात राज्यातील विविध
भागातून स्थलांतर करून येणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे आणि त्यामुळे हे नागरिकही
मतदानाच्या हक्कापासून वंचित होऊ नये म्हणून जिल्ह्यातील सहकारी गृहनिर्माण
संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहनही जिल्हाधिकारी राजेश
नार्वेकर यांनी यावेळी केले.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार एक जानेवारी 2019ची मतदार यादी अहर्ता यादी म्हणून घोषीत करण्यात आली आहे. त्या
पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील सहकारी गहनिर्माण सोसायटीमधून मोठ्या प्रमाणावर
मतदार नोंदणी होण्यासाठी जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन भवन येथे
एक बैठक पार पडली. यावेळी निवासी
उपजिल्हाधिकारी डॉ शिवाजी पाटील, उप जिल्हा निवडणूक
अधिकारी अपर्णा सोमाणी आरोळकर, तहसीलदार निवडणूक सर्जेराव
म्हस्के पाटील, ठाणे जिल्हा सहकारी गहनिर्माण संस्था फेडरेशनचे अध्यक्ष सिताराम
राणे आणि जिल्ह्यातील 80 सोसायट्याचे सचिव,अध्यक्ष उपस्थित होते.
ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर येणारे
नागरिक आणि मतदार यादीवर त्यांचा प्रभाव हा एकूणच येऊ घातलेल्या निवडणूकीत परिणामकारक ठरणार असल्याचेही जिल्हाधिकारी
नार्वेकर म्हणाले.
जिल्ह्यातील मतदारांच्या नोंदणीबाबत खंत
व्यक्त करून ते म्हणाले की, सद्य परिस्थितीत जिल्ह्यात एकूण 17 हजार 512 गृहनिर्माण संस्था आहेत. यापैकी 3 हजार 53 गृहनिर्माण संस्थांना अधिकारी व
कर्मचारी यांनी भेट दिली आहे त्यातून केवळ 22 हजार अर्ज प्राप्त झालेत. यामध्ये
नवीन नाव नोंदणी, दुबार नावे वगळणे, दुरुस्ती असे अर्ज आहेत. आणखीही मोठ्या
प्रमाणावर अर्ज येणे गरजेचे आहे, यासाठी गृहनिर्माण संस्था मोठे योगदान देऊ शकतात.
मतदान
केंन्द्रस्तरीय स्वयंसेवक
22 आँगस्ट 2012च्या शासकीय परिपञकानुसार सहकारी गहनिर्माण
संस्थेचे सचिव आणि अध्यक्ष यांना मतदान केंद्रस्तरीय स्वयंसेवक घोषीत करण्यात आले
आहे याचा आधार घेत 31ऑक्टोबर 2018 पर्यत गृहनिर्माण संस्थेतील
मतदारांध्ये मतदार यादी संक्षिप्त पुनरिक्षण जनजागृती मोहिम राबवली जाणार आहे.
यामध्ये मयत,दुबार आणि स्थलांतरितांची
नावे कमी करणे , नव्याने आलेल्या
सदनीधारकांची मतदार यादीत नोंद करणे तसेच मतदार यादीतील फोटो,चुकीची नावे,पत्ता
दुरूस्त करणे यासाठी त्या -त्या सोसायटीतील पदाधिका-यानी निवडणूक यंञणेला सहकार्य
करण्याचे आवाहन जिल्हाधिका-यानी यावेळी केले.
31आँक्टोबरपर्यत पुनरिक्षण करणे शक्य
व्हावे म्हणून गृहनिर्माण संस्थांना विधानसभा मतदार संघानिहाय मतदार यादी उपलब्ध
करून देण्यात येईल असे सांगून उप जिल्हा निवडणूक अधिकारी अपर्णा सोमाणी आरोळकर
म्हणाल्या की, मतदार नोंदणीत कुठलीही अडचण आम्ही येऊ देणार नाही. प्रसंगी
गृहनिर्माण संस्थांनी भरलेले अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागात
देखील आणून द्यावेत. तहसीलदार सर्जेराव म्हस्के पाटील यांनी देखील दुबार नावे
वगळण्याची प्रक्रिया सुरु असून यास देखील सर्वांनी सहकार्य करावे असे सांगितले.
निवासी उपजिल्हाधिकारी डॉ शिवाजी पाटील यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की,
मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावलेच पाहिजे. गृहनिर्माण संस्थांच्या
पदाधिकाऱ्यांना आता विशिष्ट अधिकार मिळाले आहेत, शिवाय त्यांच्याकडे
ओळखपत्रही दिले आहे, त्यामुळे त्यांना आपल्या संस्थेतील रहिवाशांना अधिकृतरीत्या संपर्क
करता येईल व माहिती देता येईल. यावेळी काही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना
जिल्हाधिकारी नार्वेकर यांच्या हस्ते ओळखपत्राचे वाटपही करण्यात आले.



No comments