web-banner-lshep2024

Breaking News

शासनाच्या बोध चिन्हाचा गैरवापर करणार्‍यावर कारवार्इ करा - निलेश पवार यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

BY,सरिता नार्इक,युवा महाराष्ट्र लार्इव्ह - उल्हासनगर
शासनाच्या नामावलीवर राजकीय पत्रावळी उचलण्याचे काम सध्या सत्ताधारी आणि विशेष कार्यकारी अधिकारी काही नगरसेवक,कार्यकर्ते करत असल्याची तक्रार वनवा समिती परिषदेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष निलेश पवार (उल्हासनगर) यांनी ठाणे जिल्हाधिकारी यांचेकडे केली असून कारवार्इची मागणी केली आहे.
वाहनांना काळया काचा लावणे,वाहनांना बोध चिन्हे लावणे,महाराष्ट्र शासन पाटी लावून फिरणे असे प्रकार काही विशेष कार्यकारी अधिकारी,नगरसेवक,कर्मचारी करत असल्याची तक्रार वनवा समता परिषदेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष निलेश पवार यांनी ठाणे जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन केली असता संबंधितांची चौकशी करून कारवार्इ केली जार्इल असे आश्‍वासन जिल्हाधिकार्‍यांनी दिल्याचे निलेश पवार यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले.
काळया काचा,शासनाचा अशोक चक्र बोधचिन्ह असलेल्या विशेष कार्यकारी अधिकारी काही वाहने प्रवाशी वाहतुक करतात,धाब्यावर उभ्या असतात अशा खाजगी वाहनांवर नगरसेवकांचे बोधचिन्ह,महाराष्ट्र शासन अशा पाटया आढळून येतात त्यावर पोलिस काहीही कारवार्इ करत नाहीत हा शासनाच्या बोधचिन्हाचा अशोक चक्राचा अवमान आहे याकडे निलेश पवार यांनी जिल्हाधिकार्‍यांचे लक्ष वेधले असून शहरी भागाप्रमाणे उल्हासनगर,कल्याण,मुरबाड,अंबरनाथ,बदलापूर,भिवंडी,शहापूर अशा ठिकाणी यांचा वापर सुरू आहे.त्यांचा गैरफायदा दरोडेखोर,लुटारू,खुणी,बलात्कारी घेतील,गावगुंड घेतील असे शासनाच्या निदर्शनास निलेश पवार यांनी आणून दिले असून सरकार त्यावर काय कारवार्इ करते की मतांच्या लाचारीसाठी अवैध धंद्दयांना,अवैध प्रकरणाला पाठिशी घालते याकदे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

No comments