जातपडताळणी विभागाकडून शालेय विद्यार्थ्याची गळचेपी ; 1840 चा पुरावा मागितल्याने पालकांनी मागितली कोणतेही जात ; मुख्यमंत्री खासदार आमदार मंत्री फक्त मतदानाच्या भांडवलाचे गडी
आपल्या देशात 1947 पुर्वी इंग्रजाचे राज्य होत त्या काळामध्ये शेती जमिन मालमत्ता कोणाचाही मालकीची नव्हती ना जातपात धर्म फक्त् होती ती गुलामगिरी या गुलामगिरीतून मुक्त् होण्यासाठी हुतात्म्यांनी बलिदान दिले. आंदोलने झाली जेल भोगले त्या स्वातंत्र्य् विराच्या साक्षीने बलीदानाने 1947 साली आपला भारत देश स्वातंत्र्य् झाला त्या कालावधीत इंग्रजांच्या ताब्यात असलेल्या जमिनी इंग्रजांनी सावकारांना बक्षिस दिल्या ताब्यात दिल्या त्याच जमिनी त्या काळातील पुर्वज सावकाराची चाकरी करून खंडानी कसत होत्या त्यामुळे 1947 पुर्वी मयत असलेल्याची नावे जमिनीच्या सातबारा नोंदी 14 नमुना (67 पुरावा) गांव नमुना म्हणुन नोंदी झालेल्या नाहीत.
1947 भारत स्वातंत्र्यानंतर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहीली. संविधान तयार झाले त्यानंतर 1956 साली कुळकायदा अस्तित्वात आला त्यामुळे कसले त्याची जमिन अशा कुळांच्या नोंदी झाल्या त्याचीच नोंदी महसूल खात्याच्या दफ्तरी दिसून येत आहेत.
याच भारत देशाचे राज्य महाराष्ट्र या राज्यात शिवाजी महाराजाच्या काळामध्ये जातीपाती नव्हत्या असे जानकार म्हणतात परंतू 1967 मध्ये महसूल दफ्तरी गाव नमुना 14 मध्ये एखादी व्यक्ती मयत झाली त्याची नोंदी केली गेली त्यांची जात लिहीली गेली हृया जाती महसूल अधिकार्यांनी लिहल्या.याच जातीपातीवर सध्य महाराष्ट्राचा राजकारण सुरू असून जातीच्या आधारावर शिक्षण सवलती नोकर्या आरक्षण असे उद्दयोग सुरू आहेत त्यांचा जातपडताळणी कार्यालय ठाणे,नवी मुंबर्इ कोकण भवन यांनी घेतला असून चिरीमिरी दिली दिल्यावर जातपडताळणी दाखले मिळतात.चिरिमिरी दिली नाही तर शालेय विद्दयार्थ्यांचे दाखले मिळत नाहीत असा अनुभव नंदिनी शेलार हृया 12 वी विज्ञान शाखेच्या विद्दयार्थीनीला आला असून जात पडताळणी विभागाचा जाचक अटीमुळे तिचे शिक्षण धोक्यात आले असून आता जातपडताळणीचे पुरावे शासनाने सिध्द करून द्दयावे अन्यथा आमची जात शासनानेच ठरवून दाखला द्दयावा अशी मागणी नंदिनी शेलार हिने केली आहे.
आम्हाला जातीचा दाखला,उत्पन्न दाखला सगळे कागदपत्र असताना शालेय सुविधा नाहीत,शिष्यवृत्ती नाही,जातीचा काहीही फायदा नसताना जातपडताळणीसाठी नवीमुंबर्इ कोकन भवन जातपडताळणी कार्यालयाने माझ्या वडीलांकडे चक्क आमच्या खापर पंजोबांचे 1840 च्या दरम्यान मयत झालेल्याची नोंदी पुरावे मागितल्याने र्वियार्थ्यावर आत्महत्यांची वेळ सरकारने आणली आहे.
जातपडताळणीसाठी पंजोबांचा सातबारा उतारा,चुलत पंजोबांचा 14 चा नुमना (67 चा पुरावा दाखला),आजोबांचा सातबारा,वडिलांचा सातबारा,सख्ख्या चुलत आजोबांचा जातपडताळणी दाखला,त्यांचे जातीचे,शाळेचे दाखले,वडिलांचा जातीचा व शाळेचा दाकला,भावांचा जातीचा दाखला,काकांचा जातीचा दाखला,स्वतः विद्दयार्थीचा जातीचा व शालेय दाखला,शालेय शिफारस,बोनाफार्इड,सोबत वंशावळ सत्यप्रतिज्ञापत्र,जमिनीचा 1956 चा सातबारा उतारा,फेरफार,आधारकार्ड,असे सर्वच पुरावे जोडले असताना खापर पंजोबाचा पुरावा मागवून जातपडताळणी दाखला थांबवला आहे.त्याची चौकशी शासनाने करून मला न्याय द्दयावा आणि अशा मनमानी अधिकारी कर्मचार्यावर तात्काळ निलंबनाची कारवार्इ करावी अन्यथा आमच्यावर आत्महत्येची पाल्ी झाल्यास त्यास शासन आणि जातपडताळणी अध्यक्ष,सचिव वर्ग,संबंधित विभाग अधिकारी,कर्मचारी जबाबदार राहतील असा इशारा नंदिनी शेलार हिने दिला आहे.
सन 1980 ते 2018 पर्यंत कोकणभवन ठाणे जातपडताळणी कार्यालयातुन दिलेल्या सर्व जातपडताळनी दाखल्याची चौकशी करावी.त्या सर्वांच्या छायांकित प्रति आम्हाला द्दयाव्यात आम्ही शासनाला या अधिकार्यांनी चिरीमिरी घेऊन किती खोटे दाखले दिले आहेत त्याचे पुरावे देऊ असेही त्या शालेय विद्दयार्थीनीचे म्हणणेे आहे.
माझ्या आजोबांचा माझ्या चुलतभावाचा जातपडताळणी दाखले तुम्हीच दिले आहेत त्यांचेच पुरावे जोडले आहेत,मग माझ्याच जातपडताळणीला खापर पंजोबांचा पुरावा का ? एकाच घरात दोन जातीची भाऊबंदकी असते का हे या मताच्या लाचारीसाठी सत्ता भोगणार्या मंत्री,लोकप्रतिनिधी यांना दिसत नाही का ? असा सवाल करून आम्हाला कागदोपत्री जात सरकारनेच ठरवून द्दयावी,तिचा स्विकार आम्ही करू अन्यथा जातपडताळणी अधिकार्यांच्या मनमानी छळवणूक,पिळवणूकीला कंटाळून आमचे काही बरे वार्इट झाल्यास सरकार,मुख्यमंत्री,स्थानिक लोकप्रतिनिधी,अध्यक्ष,सचिव सदस्य वर्ग,विभागीय अधिकारी,कर्मचारी जबाबदार शहरातील असा इशारा त्या विद्दयार्थीनीने दिला आहे.
जातपडताळणी शाळेतून होत नाही,त्यांच कार्यालय ठाण्याचं नवी मुंबर्इ येथील बेलापूरला स्विकारत नाहीत,्सगळे पुरावे आम्हीच घेऊन देणार मग जातपडताळणी पथक तपास काय करतात ? कशावरून खोटे कागदपत्राद्वारे पेसे गेऊन टेबलावर दाखले देत नसाल,सरकारनेच आमच्या खापर पंजोबांचा 1840 चा पुरावा आम्हाला द्दयावा असा इशारा शेलार यांनी दिला आहे.
-------------------------------------------------------------
काही वर्षापुर्वी अशाच जातपडताळणीवरून एकाला कोर्टात जाऊन सिध्द करावे लागले की माझ्या वडीलांची जी जात आहे तीच माझी आहे.त्यावर कोर्टाने त्या मुलाच्या बाजूने निर्णय दिले.हा विषय अधिवेशनात ठेवण्यात आल्याने संबंधित अधिकार्याला तात्काळ निलंबीत केले गेले.तरीही अशाच गोष्टी वारंवार जातपडताळणी विभागात अधिकारी करत असल्याने एखादया विद्दयार्थीचे जीव घेतल्यावरच शासन व कोकण भवन शांत बसेल तसे बसणार नाही.
-------------------------------------------------------------




शालेय शिक्षणाचे खाजगीकरण व बाजारीकरण थांबविणे हे शासनाला जरुरीचे नाही का वाटत. कधी कधी असे वाटते मंत्री महोदय जे शिक्षण सम्राट झाले आहेत त्यांचा पुढील पिढी चे उपजीविकासाचे साधन तयार करून ठेवले आहे. शाळा कमी व खाजगी क्लासेस जास्त प्रमाणात चालविले जात आहेत जे शालेय शिक्षक आहेत त्यांचेच खाजगी क्लासेस आहेत सगळा मनमानी कारभार चालू आहे हे कृपया थाबवा हीच आपले सरकार ला विनंती.
ReplyDelete