web-banner-lshep2024

Breaking News

मुरबाडच्या त्या दोन शाळेची मान्यताच नाही ; शाळा बंदची नोटीस

BY, कुणाल शेलार ,युवा महाराष्ट्र लार्इव्ह - मुरबाड  - 
मुरबाड तालुक्यात मोठया चर्चेत असलेल्या व्हिसडम शाळेच्या चौकशीला केराची टोपली दाखवत चक्क शासनाने व्हिसडम शाळेवर कारवार्इ न करता मुरबाडमधील मडकेपाडा जवळील ऑक्सफर्ड स्कूल व धसर्इ येथिल सरस्वती इंग्लिश मिडीयम स्कूल या शाळेची मान्यता नसल्याने त्यांना नोटीसी ठाणे जिल्हापरिषदेच्या माध्यमातून काढण्यात आले असून सदर शाळेत कोणत्याही पालकांनी या शाळेत आपल्या पाल्यांचा प्रवेश घेऊ नये असे फलक पंचायत समिती गेट बाहेर शिक्षण विभाग पंचायत समिती मुरबाड यांच्या वतीने लावण्यात आले आहे.या दोघांशाळेपैकी धसर्इ येथील सरस्वती इंग्लिश मिडीयम स्कूल ही शाळा बंद करण्यात आली असून ऑक्सफर्ड स्कूलने मात्र शासनाच्या नोटीसीला केराची टोपली दाखवत शाळा चालू ठेऊन आतुन अ‍ॅडमिशन सुरू आहेत.पालकांना मोठा प्रश्‍न पडला कि आता आपल्या पाल्याचे अ‍ॅडमिशन कोणत्या शाळेत घ्यायचे परंतू ऑक्सफर्ड स्कूल मात्र त्यांना दिलासा देतोेय कि ऑक्सफर्ड स्कूल चालूच राहणार,तुम्ही अ‍ॅडमिशन रद्द करू नका परंतू मुरबाड पंचायत समितीच्या या शाळेची मान्यता नसल्याचे फलक लावण्यात आले त्याचे काय ? इकडे आड आणि तिकड विहीर असा प्रश्‍न पालकांसमोर उभा राहिला आहे.
मुरबाड तालुक्यात या दोन शाळा कित्येक महिने वर्षे विना मान्यता असल्याने चालू होते परंतू आज कसे काय शासन जागृत झाले या आधी कधी काय नाही शाळेच्या मान्यतेची चौकशी केली गेली नाही.़मुरबाड तालुक्यात किती शाळा,तुकडया किती,किती तुकडयांना मान्यता अशा प्रकरणाकडेही लक्ष वेधला जात नसून काही शाळेच्या चौकशी़मागे हप्तेबाजीपणा चालू असून शाळेच्या डोनेशनचा प्रकार उघड होत असूनही शासनाला डोनेशन घेणार्‍या शाळेवर कारवार्इ करण्यास का दिरंगार्इ करतात,संबंधितांकडे चोखशीचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे र्इमेल पाठविले जाते परंतू संबंधितांना हप्तेबाजीची सवय असल्याने खोटया स्वरूपाचा अहवाल पाठवून तक्रारीच्या अर्जाची व शासनाची तसेच शिक्षणमंञ्यांची देखील दिशाभूल करून भोळयाभाभडया जनतेला लुटले जाते.आणि याकडे " आपले सरकार " सेटलमेंट सरकार होत आहे.मुरबाडचा शेतकरी,घाम गाळून व्यवसाय,नोकरी करणारा तो पालक आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी दिवसरात्र पराकष्ट करतो आणि शिक्षणात कोणतीही क़मी पडू देत नाही परंतू शाळा आणि विभागाचे अधिकारी हप्तेबाजीमुळे प्रेतावरच्या टाळूवरचे लोणी खाणारे आज बादशाहा म्हणून जीवन एैश आरामात जगत आहेत.

मुरबाडच्या या दोन शाळा मान्य नसल्याने बंद करण्याच्या नोटीसी फलकावर प्रकाशित करण्यात आल्या असून संबंधित ठाणे जिल्हापरिषद विभाग अधिकारी चालू असलेल्या ऑक्सफर्ड स्कूल वर काय कारवार्इ करेल याकडे सर्व नागरिक,पालकवर्ग लक्ष घालून आहेत. 

No comments