मेलचे तीन डबे रुळावरुन घसरले!
BY, युवा महाराष्ट्र लार्इव्ह – मुंबई
मुंबई-हावडा मेलचे (व्हाया नागपूर) तीन डबे रुळावरुन घसरले आहेत. मनमाड-इगतपुरीजवळ हा अपघात झाला. या अपघातामुळे उत्तर भारतात जाणाऱ्या गाड्यांवर मोठा परिणाम झाला आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.रात्री 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून, घसरलेले डबे बाजूला काढण्यात यश आले आहे.


No comments