web-banner-lshep2024

Breaking News

सफाई कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठीच वेळ पडल्यास साम, दाम, दंड व भेद या कूटनितीच वापर करणार - उद्धवजी ठाकरे

BY, युवा महाराष्ट्र लार्इव्ह - मुंबई
मुंबई महानगरपालिकेत मागील १२ वर्षांपासून काम करणाऱ्या २७०० कंत्राटी सफाई कामगारांना मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत कायम करण्याबाबत महत्वपूर्ण निर्णय मा सर्वोच्च न्यायालयाने दि. ७ एप्रिल, २०१७ रोजी दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून होत नसल्याबाबत आज दि. १४ जून, २०१८ रोजी शिवसेना भवन येथे झाली. २७०० पैकी १६०० कामगारांचे महानगरपालिका अधिकारी, युनियन प्रतिनिधी आणि सरकारी कामगार अधिकरी यांचे समक्ष मुंबई महानगरपालिकेमध्ये काम करत असल्याबाबत व्यक्तिशः पडताळणी झालेली आहे. उरलेल्या ११०० कामगारांची पडताळणी करून त्यांनाही कायम नोकरी देण्याचे आदेश म्हटले आहे. पण एक वर्ष होत आले तरीही पालिका प्रशासन पडताळणी पूर्ण करत नाही. यामध्ये पालिका प्रशासनाकडून कामगारांच्या पूर्वी दिलेल्या नावात व आताच्या आधारकार्ड वर असलेल्या नावात किरकोळ "इंग्रजी स्पेलिंग मिस्टक" असल्याने कामगारांना कायम करण्यात येत नाही. व सध्या त्यांना कामावरून कमी केले जात आहे.  
याबाबत कचरा वाहतूक श्रमिक संघाचे सरचिटणीस श्री मिलिंद रानडे यांनी शिवसेना प्रवक्त्या आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याशी संपर्क करून शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी विनंती केली होती. 
यामुळे यानंतर तात्काळ शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे यांनी या विषयाची दाखल घेत आज बैठक घेतली यावेळी ते मार्गदर्शन करताना म्हणाले की, 
● स्वछता कामगार सेवक या कामगारांचा मला अभिमान आहे. 
● असे काम या कामगारांना दुर्दैवाने करावे लागत आहे. खूप वाईट परिस्थितीत हे कामगार काम करीत असल्याचे मी स्वतः पाहिले आहे.
● नाले सफाईच्या कामाची पाहणी मी ज्यावेळी करायला जातो त्यावेळी त्यांच्या वेदना मी पहिल्या आहेत असे ते म्हणाले महापौर यांनी याबाबत बैठक घेऊन तात्काळ मार्ग काढण्याचे आदेश दिले आहेत. 
● कचरा वाहतूक श्रमिक संघाने काही कागदपत्रे श्री उद्धवजी यांच्याकडे सादर केले यावेळी अतिशय भावनिक शब्दात श्री उद्धवजीने म्हणाले की, 'या कागदपत्रांची मला आवश्यकता नाही या सर्व सफाई कामगारांवर मला विश्वास आहे' घोटाळे हे अधिकारी करतात सफाई करणारे कामगार करू शकत नाहीत.
● साम, दाम, दंड व भेद या सगळ्यांचा वापर करून या सफाई कामगारांना न्याय मिळवून देणार असे आश्वासन श्री उद्धवजीने उपस्थित कामगारांना दिले.
या बैठकीला शिवसेनेचे सचिव अनिल देसाई, कचरा वाहतूक श्रमिक संघाचे अध्यक्ष दीपक भालेराव, सरचिटणीस मिलिंद रानडे, महाराष्ट्र म्युनिसिपल कामगार युनियन अध्यक्ष एम.ए.पाटील, वरिष्ठ पत्रकार संदीप आचार्य, एन वासुदेवन, दादाराव पाटेकर, विजय साळवी उपस्थित होते.


No comments