web-banner-lshep2024

Breaking News

'आपले सरकार' पोर्टल वरील तक्रारी बाबत संबंधित नोडल अधिका-याचा काना डोळा..

By,युवा महाराष्ट्र लार्इव्ह : उल्हासनगर : 
26 जानेवारी 2015 रोजी महाराष्ट्राच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने 'आपले सरकार' हे नवे वेबपोर्टल महाराष्ट्राच्या जनतेच्या हाती दिले असून तक्रार, आपली जबाबदारी आमची या उदान्त हेतू ने हे पोर्टल सुरु केले.  त्यानुसार तक्रार निवारण प्रणालीसाठी सध्या 4 प्रशासन प्रकार निवडण्यात आले आहेत - जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, पोलिस आणि महानगरपालिका तक्रार दाखल करताना नागरिकाने निवडलेल्या पर्यायानुसार संबंधित प्रशासनाला /विभागाला तक्रार प्राप्त होते. तक्रार प्राप्त करणारा विभाग तक्रारीचे निवारण करतो. व तक्रार यशस्वीरित्या दाखल केल्यानंतर यंत्रणेद्वारे एक ई-पोचपावती जारी केली जाते. व संबंधित प्रशासनाला/विभागाला तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्यावर कारवाई सुरू असल्याची अद्ययावत माहिती तक्रारदार नागरिकाला पोर्टलवर प्राप्त करते. तसेच 21 दिवसांना नंतर तक्रारीचे निवारण झाल्यानंतर नागरिकाला तसे कळविले जाते आणि अभिप्राय नोंदविण्याची विनंती केली जाते.
           एकीकडे फडवणीस सरकार जनतेस घर बसल्या सर्व डिजिटल इंडिया अन्तर्गत 420 सुख-सोई पुरवण्याच्या उद्देशाने कार्य करत असतांना. त्या वर पाणी फिरवून जनते कडून चहा-पाण्या साठी विलंब करत कानाडोळा करणारे नोडल अधिकारी कार्यरत असल्यामुळे जनतेच्या तक्रारीचे निवारण होत नसल्याने जनतेमध्ये फडवणीस सरकारच्या नोडल अधिका-याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.

No comments