web-banner-lshep2024

Breaking News

1 जून रोजी श्रीमती.ताराबार्इ अरविंद घायवट यांच्या सेवापूर्ती सोहळयाचे आयोजन...

BY, कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लार्इव्ह - मुरबाड - 
ठाणे जिल्हयातील मुरबाडच्या मातीतील मुरबाड तालुक्याची मायमाऊली म्हणून " ताराबार्इ " यांच्या नावाची ओळखच सर्वांना त्यांच्या कार्याची आठवण करून देते.ज्येष्ठ समाजसेवक स्व.अरविंद घायवट यांच्या त्या पत्नी.श्रीमती.ताराबार्इ अरविंद घायवट मुरबाड ग्रामीण रूग्णालयात अबाल वृध्दांची सेवा करण्यापासून आलेल्या गर्भवती महिलेच्या प्रसुतीला नेहमी धाऊन जाणारे,जागाची माय माऊली म्हणून सिंधातार्इची ओळख आहे तशीच ओळख मुरबाडच्या मातीतील सर्वांची आवडती श्रीमती.तारामावशी अर्थात ताराबार्इ घायवट यांची आहे.तारामावशींनी आपले आयुष्य हे केवळ जनसामान्यांच्या सेवेसाठी घालविले आहेत.आणि महत्वाचे सांगायचे झाले तर रात्र असो वा दिवस गर्भवती महिला प्रसुतीसाठी आली असता तिच्यासाठी सदैव आर्इ म्हणून त्या गर्भवती महिलेची काळजी घेणारी आपली लाडकी आर्इ सर्वांची तारामावशी निर्भिडपणे आपली भुमिका बजावत आली आहे.केवळ सेवा म्हणजे आपले काम नव्हे तर खर्‍या अर्थाने त्यांच्या मायेने आणि प्रेमाणे सर्वांच्या मनात घर केल्याने मला हजारोंकडून जे आर्इ या शब्दाचे मान मिळाले तेच माझी खरी सेवा असे यावेळी तारामावशी यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले.
कित्येक गर्भवती महिलेची प्रसुती तारामावशी यांनी केल्या.आज सांगायचे झाले तर हजारो संख्येने महिलेल्या प्रसुतीला आर्इ म्हणून माया देणारी आपली तारामावशी मुरबाड सारख्या ग्रामीण भागाचे नाव जिल्हयात नेलेच परंतू महत्वाचे म्हणजे ठाणे जिल्हयासह नगर,पुणे,या ठिकाणच्या महिलांच्या प्रसुती तारामावशी यांनी केल्या.
त्यांच्या याच कार्यालापाहून आमदार किसनराव कथोरे मुरबाड विकासमंच संस्थेच्या अध्यक्षा सौ.ज्योतीतार्इ नामदेव शेलार,श्री.नामदेव शेलार तसेच कलावंत,ज्येष्ठ समाजसेवक यांच्या हस्ते ताराबार्इ घायवट यांना अबाल वध्दांची सेवेसाठी आपले जीवन व्यथीत केले म्हणून जीवनगौरव पुरस्कार देण्यात आले.असे विविध पुरस्कार ताराबार्इ घायवट मिळाले आहे.गेले 37 वर्षे तारामावशी यांनी आरोगय विभागात "दायी" या पदाचा कार्यकाळ यशस्वीपणे पुर्ण केले असून येत्या 31 मे 2018 रोजी त्या सेवानिवृत्त होत आहेत त्याच बरोबर तारामावशींचा 1 जूनला वाढदिवस असल्याने वाढदिवसाचे औचित्य साधून 1 जून 2018 रोजी कुणबी समाज सभागृह,साजर्इफाटा,मुरबाड येथे सायं 6 वा.सेवापूर्ती सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे तरी आपल्या आर्इला शुभेच्छा देण्यासाठी सर्वांनी या सोहळयाला आवर्जुन उपस्थित राहावे असे आवाहन विजय अरविंद घायवट यांनी केले आहे.

No comments