खासदार बाळ्यामामांच्या निवासस्थानी विराजमान श्री गणरायांचे आमदार किसन कथोरे यांनी घेतले मनोभावे दर्शन
गौरव शेलार / मुरबाड
:
भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांच्या
निवासस्थानी विराजमान झालेल्या श्री गणरायांचे मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार
किसन कथोरे यांनी मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी आमदार किसन
कथोरे यांनी श्री गणरायांची पूजा-अर्चा करून सर्वांच्या सुख,
समृद्धी आणि आरोग्यासाठी बाप्पाच्या चरणी प्रार्थना केली.
गणरायाच्या कृपेने सर्वांच्या जीवनात आनंद, समाधान आणि भरभराट नांदो,
अशी मनोकामना व्यक्त केल्याचे आमदार किसन कथोरे यांनी सांगितले.
यावेळी खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांच्या
निवासस्थानी गणेशभक्तीमय वातावरण पाहायला मिळाले. गणरायाच्या दर्शनानिमित्त
उपस्थितांनीही भक्तिभावाने बाप्पाचे दर्शन घेतले.



No comments