नामवंत समाजसेवक कै.भगवान हरी घरत यांचे निधन
कुणाल शेलार/मुरबाड : मुरबाड तालुक्यातील म्हसा परिसरातील समाजसेवक कै.भगवान हरी घरत यांचे शुक्रवार,दि.29 ऑगस्ट 2026 रोजी निधन झाले.त्यांच्या निधनाने घरत कुटुंबीयांसह नातेवाईक, मित्रपरिवार व तालुक्यातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
कै.भगवान हरी घरत यांनी सामाजिक बांधिलकी जपत समाजाच्या विविध उपक्रमांमध्ये योगदान दिले.साधे,मनमिळावू आणि समाजहिताची भावना जपणारे व्यक्तीमत्व म्हणून त्यांचा परिचय होता.त्यांच्या निधनाने परिसराने एक सामाजिक कार्यात सदैव पुढाकार घेणारे व्यक्तिमत्त्व गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.गेल्या अनेक वर्षात गोरगरिब जनतेची कामे त्यांनी प्रशासनाच्या माध्यमातून करून दिली.त्यांच्या माणूसकीच्या झरीने हजारो नागरिकांची मने जिंकून घेतली होती.ज्यांना प्रशासकीय योजना मिळण्याच्या ज्ञान नव्हते,सातबारा,8 अ,फेरफार माहिती नव्हते अशांना आपल्या ज्ञानाचे वाटप करून अनेक युव नागरिकांच्या ज्ञानाचे भंडार वाढवून दिले.त्यांचे योगदान कागदावर लिहाल तेवढे कमी असून भूमीपुत्र म्हणून पैसा नव्हे तर हिर्यासारखी माणसी कमविली म्हणून त्यांना आदराने व प्रेमाणे सर्व घरत तात्या म्हणू लागले.अडलेल्यांनी आवाज दिला की आमचा तात्या तिथं एका हाकेला पाहोचायचा आता आमचा तात्या नाही हे दुखः पचवत नाहीत परंतु त्यांच्या आठवणींचा ओंजाळा आमच्या हृदयात कायम असेल अशा भावना नागरिकांकडून व्यक्त होत असून त्यांना भावपूर्ण श्रंध्दांजली अर्पण केली आहे.
आज घरत तात्यांच्या पश्चात श्री.हरी वामन घरत (वडील),श्री.अरुण हरी घरत (भाऊ), श्री.हिरामण वामन घरत (चुलते),श्री.गणेश हिरामण घरत (भाऊ),कु.मंदार भगवान घरत (मुलगा), कु़.नितीन हिरामण घरत (भाऊ) व कु.केतकी भगवान घरत (मुलगी) असा परिवार आहे.कै.भगवान हरी घरत यांचे दशक्रिया विधी रविवार, दि.30 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 वाजता श्री क्षेत्र विजेश्वर मठ, म्हसा येथे होणार आहे.तसेच उत्तरकार्य सोमवार,दि.31 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता घरी,बोरीवली येथे होणार आहे.



No comments